सरदार मोमीन मेमोरियल 14 वर्षांखालील महाराष्ट्र राज्य टेनिस अजिंक्यपद 2022स्पर्धेत एकेरीत पुण्याच्या अभिराम निलाखे, नवी मुंबईच्या आनंदी भुतडा यांना विजेतेपद 

 
  • दुहेरीत मुलांच्या गटात आर्यन चंदनखेडा व अंशीत देशपांडे यांना, तर मुलींच्या गटात  श्रावणी देशमुख व सेजल भुतडा यांना विजेतेपद 
कोल्हापूर :  कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन(केएसए) व कोल्हापूर जिल्हा  लॉन टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सरदार मोमीन मेमोरियल 14 वर्षांखालील महाराष्ट्र राज्य टेनिस अजिंक्यपद 2022स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात पुण्याच्या अभिराम निलाखे याने तर, मुलींच्या गटात नवी मुंबईच्या आनंदी भुतडा  या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
 
मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित पुण्याच्या अभिराम निलाखे याने नाशिकच्या दुसऱ्या मानांकित अंशीत देशपांडेचा 6-1,6-4 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. अभिराम हा आठवी इयत्तेत बालशिक्षण शाळेत शिकत असून पार्थ चिवटे टेनिस अकादमीत प्रशिक्षक पार्थ चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. मुलींच्या गटात अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित नवी मुंबईच्या आनंदी भुतडा हिने आपली शहर सहकारी अभिलिप्सा मल्लिकचा 6-2,4-6,10-7 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. 
 
दुहेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत नाशिकच्या आर्यन चंदनखेडा व अंशीत देशपांडे यांनी पुण्याच्या अभिराम निलाखे व विश्वजीत सणस यांचा 3-5, 4-2, 10-6 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात पुण्याच्या श्रावणी देशमुखने नवी मुंबईच्या सेजल भुतडा साथीत नवी मुंबईच्या अभिलिप्सा मल्लिक व आनंदी भुतडा या जोडीचा 4-2, 4-5, 10-7 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एआयटीएचे सहसचिव व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, कोल्हापूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, केडीएलटीए सचिव आशिष शहा, केडीएलटीएचे सचिव आशिष शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे विभागीय समन्वयक शितल भोसले, मेहुल केनिया, हिमांशू गोसावी, केडीएलटीएचे प्रशिक्षक अर्शद देसाई, राजेंद्र दळवी, संभाजी मंगोरे पाटील, केएसएचे प्रशिक्षक प्रकाश पाटील, दिपक घोडके आणि स्पर्धा निरीक्षक मानल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
 
निकाल: अंतिम फेरी: 14 वर्षाखालील मुले: अभिराम निलाखे(पुणे)(1) वि.वि.अंशीत देशपांडे(नाशिक)(2)6-1,6-4;   
 
14 वर्षाखालील मुली: आनंदी भुतडा(नवी मुंबई)(3)वि.वि.अभिलिप्सा मल्लिक(नवी मुंबई) 6-2,4-6,10-7; 
 
दुहेरी: अंतिम फेरी: मुले: आर्यन चंदनखेडा(नाशिक)/अंशीत देशपांडे(नाशिक)वि.वि.अभिराम निलाखे(पुणे)/विश्वजीत सणस(पुणे) 3-5, 4-2, 10-6;
मुली: श्रावणी देशमुख(पुणे)/सेजल भुतडा(नवी मुंबई)वि.वि.अभिलिप्सा मल्लिक(नवी मुंबई)/आनंदी भुतडा(नवी मुंबई) 4-2, 4-5, 10-7


Leave a Reply

%d bloggers like this: