Pune Crime – भर रस्त्यात कुऱ्हाडीने वार करून तरुणाचा खून

पुणे : नांदेड येथील बांधकाम व्यावसायिकाला गोळ्या घालून खून केल्याची घटना ताजी असतानाच अशाच एका घटनेने पुणे शहर हादरले आहे. उधार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून भररस्त्यात एका तरुणाचा कुऱ्हाडीने डोक्‍यावर सपासप वार करत खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फुरसुंगीतील पापडेवस्ती येथील धनराज डेअरी येथे ही घटना घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज बाबुराव जाधव (34) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे वडिल बाबुराव माणिक जाधव(55) यांनी फिर्याद दिली आहे. तर गणेश सुरेश खरात (35,रा.पापडे वस्ती, फुरसुंगी) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे.

फिर्यादी बाबूराव जाधव यांची दुध डेअरी आहे. त्यांचा मुलगा त्यांना व्यवसायात मदत करतो. तर आरोपी गणेश हा मिळेल तशी मोलमजुरीची कामे करतो. त्याने फिर्यादीचा मुलगा युवराज याच्याकडून 20 हजार रुपये हात उसणे घेतले होते. युवराज हा गणेशकडे सातत्याने हात उसणे दिलेले पैसे मागत होता. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गणेश हा युवराज याच्या घराबाहेर आला होता. तेव्हा युवराजने पुन्हा एकदा गणेशकडे पैशासाठी तगादा लावला. याचा राग आल्याने गणेशने जवळील कुऱ्हाडीने युवराजच्या डोक्‍यावर सपासप वार केले. युवराजच्या डोक्‍यावर, चेहऱ्यावर, मानेवर आणि तोंडावर गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक खरात तपास करत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: