मनसे नेते वसंत मोरे व साईनाथ बाबर यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर

पुणे : गुढीपाडवा मेळाव्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेल्या मशीदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेमुळे पक्षालाच फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.
मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माझ्या प्रभागातल्या मंदिरात मी भोंगे वाजवणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यावर बहीण म्हणून मी वसंत मोरेंच्या पाठीशी आहे. त्यांनी जी भूमिका घेतली, ती योग्यच आहे. कारण ते लोकप्रतिनिधी आहेत, अशी पाठराखण राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केली आहे. यानिमित्ताने त्यांनी मनसे नेते वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची अप्रत्यक्ष ऑफरच दिली आहे.

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, राज ठाकरेंची सभा ही भाजपाची होती. राज ठाकरेंनी यू-टर्न घेतला आहे. असे होईल हे कोणालाही वाटले नव्हते. राज ठाकरे म्हणाले, की शरद पवारांमुळे जातीवाद वाढला. तर मग हसन मुश्नीफ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे मंत्री असते का, असा सवाल त्यांनी राज ठाकरेंना केला आहे. राज ठाकरेंना भाजपाने बोलायला लावले. भाजपाने हे घडवून आणले आहे, अशी टीका रुपाली पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: