Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

अखेर एस.आर.पी.एफ. चे गेट वानवडीकरांसाठी खुले – प्रशांत जगताप यांच्या प्रयत्नांना यश

पुणे : गेल्या दिड वर्षांपूर्वी काही नागरिकांनी केलेल्या कायदेशीर तक्रारींमुळे एस.आर.पी.एफ. गट क्रमांक २ मधील अलंकार लॉन्स शेजारी असणारा रस्ता प्रशासनाने गेट लावत बंद केला होता. वानवडी येथील विकासनगर, तात्या टोपे सोसायटी, जय जवान सोसायटी, एस.आर.पी.एफ. गट क्रमांक १ व २ मधील रहिवासी या सर्व रहिवासी परिसरातील नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीने सोयीस्कर व जवळच असणारा रस्ता अचानकपणे बंद झाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. अखेर एस.आर.पी.एफ. चे गेट वानवडीकरांसाठी खुले करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेस चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. 

कायदेशीरदृष्ट्या पाहिल्यास हा रस्ता गेल्या साठ वर्षांपासून वानवडी परिसरातील रहिवासी ये-जा करण्यासाठी वापरत असे, तसेच पुणे महानगरपालिका या रस्त्याचे देखभाल व दुरुस्तीचे काम करत .असे असताना अचानकपणे काही नागरिकांच्या तक्रारींमुळे हा रस्ता बंद करण्यात आला यावेळी समस्त वानवडी परिसरातील नागरिकांच्या वतीने प्रशांत जगताप यांनी हा रस्ता सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले कोरोना चा काळ संपल्यानंतर मंत्रालय दरबारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्या सूचनेनुसार गृहमंत्री  दिलीपर वळसे-पाटील  यांच्या खात्याचा अख्यारीत हा प्रश्न असल्याने वेळोवेळी त्यांच्याकडे पाठपुरावा करत त्यांच्या दालनात यासंदर्भात बैठका घेण्यात आल्या.

०१ एप्रिल रोजी वळसे-पाटील  यांच्या मंत्रालय येथील दालनात राज्याचे पोलीस महासंचालक  रजनीश शेठ,गृहसचिव  आनंद  लिमये, जिल्हाधिकारी राजेश देशमुख ,एस आर.पी. एफ.गटाचे Adg  चिरंजीव प्रसाद,dig  बाविस्कर साहेब, एस आर.पी. एफ.क्रमांक गट २ चे कमांडंट मा.श्री.मंगेशजी शिंदे, एस आर.पी. एफ. गट क्रमांक १ चे कमांडंटसंदीप दिवाण, शांत जगताप यांच्यासह या सर्व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची मंत्रालय मुंबई येथे एक बैठक पार पडली. त्या बैठकीत आदरणीय गृहमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार गेल्या सोमवार दिनांक ०४ एप्रिल रोजी या सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्पॉटवर पाहणी केली व सर्व कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर अखेर ०५ एप्रिल रोजी मध्यरात्री हे गेट सर्वांसाठी खुले करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, हा विजय सत्याचा असून, गेल्या दीड वर्षांपासून केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही शक्य झाले. माझ्या वानवडीकरांसाठी अस्मितेचा, जिव्हाळ्याचा, रोज होणाऱ्या गैरसोयीचा हा विषय सोडवू शकलो, याचा निश्चित मनस्वी आनंद आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading