fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

मनसेचा पुणे पोलिसांना अल्टीमेटम; मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा स्पीकर लावून हनुमान चालीसाचे पठण करू

मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसेने खडक पोलिस स्टेशनला दिले पत्र

पुणे : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसेचे पुणे शहरात दोन मत आहेत. त्यामुळे या मुद्यावरून खळखट्याक होणार का? असा सवाल उपस्थित होत होता. दरम्यान, सर्व मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसेने खडकमाळ पोलिस स्टेशनला पत्र दिले आहे. मनसेकडून या मशिदींना भोंगे काढण्यासाठी चार दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. भोंगे न काढल्यास दुप्पट पटीने स्पीकर लावून हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची माहिती राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी दिली आहे.

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. राज ठाकरेंनी ‘यू टर्न’ घेतला असा टीकेचा सूर आहे. मशीदीच्या समोर भोंगे लावून हनुमान चालिसा लावा, हे त्यांचं विधान चांगलंच वादग्रस्त ठरलं. त्यामुळे अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. दरम्यान, आता मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसेने पुण्यात आणखी एक पाऊलं उचललं आहे. सर्व मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसेने खडक पोलिस स्टेशनला पत्र दिले आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading