आयएनएस विक्रांत बचाओ निधीचा अपहार – किरीट सोमय्या यांच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन

पुणे : किरीट सोमय्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्याच्या मुला सहित सामील असून तसेच आयएनएस विक्रांत बचाव नावाखाली महाराष्ट्रातील जनतेकडून जी वर्गणी गोळा करण्यात आली त्यात मोठी अफरातफर केलेली असताना, महाराष्ट्रातील मविआ आघाडीचे नेते आणि शिवसेना नेते, खा संजय राऊत साहेब यांच्या वर बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करायचे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून शिवसेना नेत्यांवर कट कारस्थान करून बदनामी करण्याचा जो कुटील डाव आखला आहे त्याचा पुण्यात शनिपार चौक येथे कसबा मतदारसंघ शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

ईडी भाजपचा घरगडी…विक्रांत चे पैसे हडपणारा कोण….? मुलुंडचा चोर… अशा घोषणा देण्यात आल्या तसेच वाढती महागाई आणि बेरोजगारी कडे सुद्धा ह्या आंदोलनातून लक्ष वेधण्यात आले,
महागाई वाढती आहे मस्त, मोदी, शाह महाराष्ट्रात ईडी, इन्कम टॅक्स कारवाई करण्यात व्यस्त…
ह्या घोषणाही आंदोलनाच्या प्रसंगी देण्यात आल्या.

त्या वेळी कसबा मतदार संघातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. नंदकुमार येवले, अरविंद दाभोळकर, राजेश मांढरे, नितीन रावळेकर, सुरेंद्र जोशी, सनी गवते, युवराज पारीख, बाळासाहेब मालुसरे, राजेन्द्र शिंदे, नागेश खडके, अमर मारटकर, राजेंद्र गिरी, रुपेश पवार, अनंत घरत, संजय जगताप, शिवाजी मेलेकरी, तुषार भोकरे, हर्षद ठकार, गिडेन बेन, युवासेनेचे – शंकर साठे, अक्षर फुलसुंदर, प्रशांत पैलवान, राजन अवघडे, प्रथमेश नेटके, मुरली विलकर, सत्यजित कवडे, संदीप साळुंखे.
युवती सेना सहसचिव- शर्मिला येवले, गायत्री गरुड, ईशा येवले,रिद्धी मांढरे वैभवी सूर्यवंशी, निकिता मारटकर, स्वाती कत्थलकर, राजश्री भगणे, सुलभा तळेकर, ज्योती पवार, अनुपमा मांगडे, उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: