‘हाय पॉवर ऑफिस मॅनेजमेंट’ या अभिनव अभ्यासक्रमाचे दालन पुण्यात खुले

पुणे : इन्स्टिटयूट ऑफ पर्सनल असिस्टंट ट्रेनिंग ” (iPAT) संस्थेच्या माध्यमातून “हाय पॉवर ऑफिस मॅनेजमेंट” विषयक अभिनव अभ्यासक्रमाचे दालन पुण्यात खुले झाले असून भारतात उपलब्ध असलेला हा अशा प्रकारचा एकमेव प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आला आहे.

‘इन्स्टिटयूट ऑफ पर्सनल असिस्टंट ट्रेनिंग’ चे चित्रसेन गायकवाड व शशांक पाटील , प्रशांत कोठडिया, विश्वजित इनामदार, विद्याभूषण आर्य यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

कॉर्पोरेट, प्रशासन, राजकारण, सेलीब्रिटी, खासगी व्यवसायकांपासून शैक्षणिक, सामाजिक संस्थांना मोठ्या प्रमाणावर अश्या जवाबदाऱ्या हाताळणारे उच्चशिक्षित, हुशार, प्रशिक्षित युवक लागतात. जवाबदारी मोठी असल्याने पगार आणि सुविधा चांगल्या मिळतात. मात्र त्यांचे प्रशिक्षण करणाऱ्या शैक्षणिक सुविधा, अभ्यासक्रम पुरेशा प्रमाणात भारतात नाही. ही उणीव लक्षात घेऊन “इन्स्टिटयूट ऑफ पर्सनल असिस्टंट ट्रैनिंग” (iPAT) संस्थेची स्थापना करण्यात आली असून अश्या जबाबदारीच्या पदांवर लागणाऱ्या सर्व कौशल्ये आणि प्रशिक्षणाची जोड ‘इन्स्टिटयूट ऑफ पर्सनल असिस्टंट ट्रेनिंग’ कडून या ४५ दिवसांच्या अभ्यासक्रमात देण्यात आली आहे.

‘इन्स्टिटयूट ऑफ पर्सनल असिस्टंट ट्रेनिंग’ (iPAT) हे प्लेसमेंटसाठी मदत करणार आहे. यातील विद्यार्थ्यांना १०००० ड्राफ्ट्स देण्यात येणार आहे., यात विविध विषयांचे ड्राफ्ट्स, पत्र, रिपोर्ट्स, फॉरमॅट्स आहेत. एखाद्या व्यक्तीला, संस्थेला पी.ए हवा असल्यास ते iPAT ला संपर्क करू शकतात. हा कोर्से ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येऊ शकतो.

या अभिनव विषयाचे महत्व लक्षात घेऊन दर आठवड्याला एक कार्यशाळा विनामूल्य घेतली जाणार आहे, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

अधिक माहिती http://www.ipatinstitute.com संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: