‘पार्टटाइम’ काम करणाऱ्यांनी मला पक्षनिष्ठा शिकवू नये; वसंत मोरे यांचा अजय शिंदे यांना टोला

पुणे : माजी नगरसेवक आणि मनसेचे  शहराध्यक्ष वसंत मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना कालपासून उधान आले आहे. मात्र या सर्व चर्चा केवळ चर्चा आणि अफवा असल्याचे स्पष्टीकरण देत वसंत मोरे यांनी आपण मनसे सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या वृत्ताचे खंडन केले. ते म्हणाले मी कुठे ही जाणार नाही. मी पक्ष सोडणार नाही. पार्ट टाइम काम करणाऱ्यांनी मला पक्ष निष्ठा शिकवू नये.असा टोलाही त्यांनी मनसे राज्य सरचिटणीस अजय शिंदे यांना लगावला.

मात्र, राज ठाकरे यांच्या या आदेशाचे पुण्यात पालन होणार नसल्याचे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे. ते बोलताना म्हणाले. सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात मला शांतता हवी आहे. म्हणून असे कोणतेही पाऊल मी उचलणार नाही. काही अनधिकृत गोष्टी असल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले आहे. तसेच आपण राज ठाकरेंवर किंवा पक्षावर नाराज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

वसंत मोरे म्हणाले, मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. मात्र माजिद शेख, शहाबाज पंजाबी त्यांची नाराजी दूर केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला एका जाहीर भाषणात मशीदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेमुळे वसंत मोरे नाराज आहेत, अशा चर्चा दिसून आल्या राष्ट्रवादीचे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पण मी नगरसेवक साईनाथ बाबर व वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास अप्रत्यक्ष आमंत्रित केले आहे. त्यावर वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

 

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: