यथार्थ हॉस्पिटल अँड ट्रॉमा केअर सर्व्हिसेस लिमिटेडने फ्रेश इश्यू आणिइक्विटी शेअर्सचे ओएफएस असलेल्या आयपीओसाठी केला अर्ज दाखल
पुणे : रुग्णालयातील खाटांच्या संख्येच्या बाबतीत (स्रोत: CRISIL अहवाल) दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील (“दिल्ली NCR) अग्रणी १० सर्वात मोठ्या खाजगी रुग्णालयांमधील (आर्थिक वर्ष २०२१ मध्ये) एक असलेल्या यथार्थ हॉस्पिटल अँड ट्रॉमा केअर सर्व्हिसेस लिमिटेड (“YHTCSL” किंवा “द कंपनी”) ने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (“SEBI”) कडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“DRHP”) सादर केला आहे.
प्रत्येकी १० रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफरद्वारे निधी उभारण्याची कंपनीची योजना आहे. ऑफरमध्ये ६१०० दशलक्ष रु. पर्यंतचे (“फ्रेश इश्यू”) फ्रेश इश्यू समाविष्ट आहेत आणि “प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर” (“विक्रीसाठी ऑफर”) द्वारे एकूण ६, ५५१, ६९० इक्विटी शेअर्सची विक्रीची योजना आहे.
कंपनीने फ्रेश इश्यूमधून मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाचा वापर (i) कंपनी आणि तिच्या उपकंपनीद्वारे घेतलेल्या एकूण कर्जाच्या पूर्ण/ काही अंशी भागाची परतफेड/मुदतपूर्व पेमेंट करण्यासाठी (ii) कंपनी आणि तिच्या उपकंपनीच्या भांडवली खर्चाच्या गरजांसाठी निधी देणे आणि अजैविक वाढीसाठी निधी देणे; (iii) इतर धोरणात्मक उपक्रम आणि कॉर्पोरेट हेतूसाठी विनियोग करणे यासाठी करणार आहे.
६, ५५१, ६९० इक्विटी शेअर्स पर्यंतच्या ऑफर फॉर सेलमध्ये विमला त्यागी यांचे ३, ७४३, ००० पर्यंतचे इक्विटी शेअर्स, प्रेम नारायण त्यागी यांचे पर्यंतचे २, ०२१, २०० इक्विटी शेअर्स आणि नीना त्यागी यांचे ७८७,४९० पर्यंतचे इक्विटी शेअर्स आहेत (“प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर”).
इंटेन्सिव्ह फिस्कल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, अॅम्बिट प्रायव्हेट लिमिटेड आणि आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड हे इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.
आर्थिक वर्ष २०२१ मधील खाटांच्या संख्येच्या बाबतीत यथार्थ हॉस्पिटल अँड ट्रॉमा केअर सर्व्हिसेस लिमिटेड हे राष्ट्रीय राजधानी विभागातील (“दिल्ली NCR”) अग्रणी १० सर्वात मोठ्या खाजगी रुग्णालयांपैकी एक आहे. (स्रोत: CRISIL अहवाल). या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या तारखेपर्यंत त्यांच्यातर्फे दिल्ली एनसीआर मध्ये म्हणजेच नोएडा, ग्रेटर नोएडा आणि नोएडा एक्स्टेंशन, उत्तर प्रदेश येथे तीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालवली जात आहेत. ४५० खाटांचे नोएडा एक्स्टेंशन हॉस्पिटल हे उत्तर प्रदेशातील नोएडा एक्स्टेंशनमधील सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक आहे.
यांनी अलीकडेच झांशीजवळ मध्य प्रदेशातील ओरछा येथे ३०५ खाटांचे मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल विकत घेतले आहे. ते झाशी-ओरछा-ग्वाल्हेर प्रदेशातील सर्वात मोठे रुग्णालय आहे (स्रोत: क्रिसिल रिपोर्ट). या संपादनासह त्यांची एकूण बेड क्षमता वाढून १४०५ बेड झाली आहे. याव्यतिरिक्त, त्यांच्या गंभीर आजार काळजी कार्यक्रमात ३१ जानेवारी २०२२ पर्यंत ३१८ क्रिटिकल केअर बेडचा समावेश आहे. त्यांची सर्व रुग्णालये दिल्ली एनसीआर मध्ये आहेत आणि त्यांना एनएबीएच ची मान्यता प्राप्त आहे. ३१ जानेवारी, २०२२ पर्यंत, कंपनीने ३७० डॉक्टरांची नियुक्ती केली आहे आणि अनेक स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटीज रुग्णालयात आरोग्य सेवा पुरविली जात आहे.