Pune – राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

पुणे: गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेल्या मशीदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेमुळे पक्षालाच फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.
याच कारणामुळे मी माझ्या प्रभागामध्ये हनुमान चालीसा वाजवणारे भोंगे मशीदींसमोर लावणार नसल्याचे मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले आहे. तर दुसरीकडे मनसेचे सरचिटणीस  अजय शिंदे यांनी नेमकी मोरे यांच्या विरुद्ध भूमिका मांडली आहे. त्यामुळे पुण्यातील मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

अजय शिंदे म्हणाले, मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी जे आपली भूमिका मांडली आहे. ती राज साहेबांचा आदेश धुडकावून लावला आहे. मनसे पहिल्यापासून मराठी तरुणांसाठी व माणसांसाठी सतत काम करत राहिले आहे. बिहारी लोकांना मारणे आंदोलन करणे ह्याच्या मुळे आमच्यावर गुन्हे सुद्धा दाखल आहे. जो राज साहेब आदेश देतील तो आम्हा सर्वांसाठी शेवट असतो.

वसंत मोरे यांनी सकाळी आपली भूमिका मांडल्यानंतर मी तुमच्यासमोर भूमिका मांडत आहे. आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत ते राजसाहेब ठाकरे पर्यंत पोहोचले आहेत. जर राज्यसरकारने भोंगे मशिदीसमोर लावण्याचे परवानगी दिली असती तर तर राज ठाकरे यांनी भूमिका घेतली नसती. मनसे च्या शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी त्यांच्या प्रभागामध्ये हनुमान चालीसा वाजवणारे भोंगे मशीदींसमोर लावणार नसल्याचे म्हटले आहे. राज  ठाकरे यांचा आदेश अंतीम होय आम्ही हिदूच !वैयक्तिक भूमिकेला पक्षात स्थान नाही. असे अजय शिंदे यांनी सांगितले. 

Leave a Reply

%d bloggers like this: