साधना कन्या विद्यालयात रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांना अभिवादन

पुणे : रयतच्या चं. बा. तुपे साधना कन्या विद्यालयात रयत माऊली सौ लक्ष्मीबाई पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विद्यालयाच्या प्रांगणात रयत माऊली लक्ष्मी वहिनी यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. एम. जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ चंद्रकांत खिलारी तर प्रमुख पाहुणे म्हणून रयतचे विभागीय अधिकारी किसनराव रत्नपारखी,प्राचार्य  विजय शितोळे, विद्यालयाच्या प्राचार्या सुजाता कालेकर ,  रोहिणी सुशिर, झीनत सय्यद,  लक्ष्मी आहेर ,  लालासाहेब खलाटे, छाया पवार, योजना निकम उपस्थित होते.

थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यास लक्ष्मी वहिनींनी आयुष्यभर साथ दिली. बहुजन समाजातील मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी कर्मवीरांनी सुरू केलेल्या वसतिगृहातील मुलांची लक्ष्मी वहिनींनी तन-मन-धन अर्पण करून काळजी घेतली. मुलांना आईचे प्रेम आणि माया दिली. वसतिगृहातील मुलांच्या जेवणासाठी आपला शेवटचा अलंकार ‘मंगळसूत्र’ मोडणाऱ्या रयत माऊली लक्ष्मी वहिनींचे जीवन आजच्या तरुणींसाठी प्रेरणादायी असल्याचे मत विभागीय अधिकारी किसनराव रत्नपारखी यांनी व्यक्त केले. तर प्राचार्य विजय शितोळे यांनी सौ लक्ष्मी वहिनी यांच्या ठिकाणी वात्सल्य, माया, ममता आणि त्यागाची भावना दिसते असे म्हटले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ चंद्रकांत खिलारी म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांचा आदर्श समाजातील सर्व घटकांनी घेतला तर नव्या समाजाची निर्मिती होईल. लक्ष्मीबाईंच्या त्यागमय कार्यामुळेच रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा वटवृक्षासारखा विस्तार झाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी कु संतोषी जंजिरे,उपशिक्षिका तिरूमला माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाच्या प्राचार्या सुजाता कालेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर पर्यवेक्षिका  प्रतिभा कुंभार यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: