fbpx

अंध शाळेतील बालकांनी लुटला आंब्यांचा आनंद

पुणे : कोरेगाव पार्क येथील अंध शाळेतील  बालचमूंनी ( मुलांनी ) पहिल्यांदा या वर्षीचा फळांचा राजा आंबा खाण्याचा मनसूक्त आनंद घेतला.  जगात सर्वांचा आवडते फळ आंब्याचे सुमारे १५९ शाळेतील विद्यार्थ्यांनी मनसूक्त  खाऊन एक प्रकारे आनंदोत्सव साजरा केला. काही मुले आख्खा आंबा चोखुन खाताना दिसत होती, तर काही मुलांनी आंब्याची फोड खाणे पसंद केले. 

आंबा हा केवळ फळ नसून त्याला सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळख अख्या जगात प्रसिद्ध आहे. लहान मुलांपासून ते आजी आजोबांचे सर्वांचे आवडणारे फळ म्हणजेच ” आंबा “. सर्व मुलांच्या  चेहेऱ्या वर आंबे खाण्याचा आनंद काही वेगळाच होता. जग दिसत नाही पण दुःखी न होता, कुठलीही तक्रार न करता जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने कसे जगावे या मुलांनी सर्वांना शिकवले. 

पायल तिवारी ( बिटिया ) फाउंडेशन तर्फे पायल तिवारी च्या स्मृती प्रित्यर्थ हा उपक्रम घेण्यात आला. ह्यावेळी संगीता  तिवारी (  अध्यक्ष, पायल तिवारी ( बिटिया ) फाउंडेशन ), शिल्पी सिंग 
( समाजसेविका ), पौर्णिमा लुनावात ( समाज सेविका ),  नीतू झा, पुनमीत तिवारी, हर्ष तिवारी, कृष्णा  शेवाळे ( पदाधिकारी, अंध मुलांची शाळा ),मा, सुशील राठोड उपस्थित होते. 

Leave a Reply

%d bloggers like this: