Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

असत्यमेव जयते; ईडीने किती उड्या मारल्या तरी तोंडावर पाडू – संजय राऊत

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ED ने दणका दिला आहे. ईडीने संजय राऊत यांचे दादरमधील वापरात असलेला एक फ्लॅट आणि अलिबागमधील ८ प्लॉट जप्त केले आहेत. दरम्यान, कितीही कारवाई केली तरी संजय राऊत आणि शिवसेना घाबरणार नाही, ईडीने किती उड्या मारल्या तरी आम्ही त्यांना तोंडावर पाडू, अशी स्पष्ट प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. दरम्यान कारवाईनंतर ‘असत्यमेव जयते’ असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.

… तर माझी मालमत्ता भाजपला दान करेल 

माध्यमांशी संवाद साधतांना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, कितीही कारवाई केली तरी मी तुमच्या बापाला घाबरत नाही. एक रुपया जरी कुठल्या गुन्हेगारी स्वरुपातील असेल आणि त्या पैशाच्या माध्यमातून मालमत्ता खरेदी केली असेल तर, मी राजकारण सोडून देईल, समाजकारण सोडून देईल. इतकेच नव्हे तर माझी उर्वरीत मालमत्ता भाजपला दान करेल.  

असत्य कारवाईपुढे कधीही गुडगे टेकणार नाही

पुढे बोलताना ते म्हणाले, मला एक पूर्ण कल्पना होती की, ईडी माझ्या मागे लागली आहे. सीबीआय लागेल कारण ज्या पद्धतीने आम्ही महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. ज्या पद्धतीने राज्यसभा चेयरमन व्येंकैया नायडूंना पत्र लिहिले आहे. कसे ज्या प्रकारे महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे मदत केली नाही तर आम्ही तुमच्यावर कारवाई करुन अटक करु असे मी पत्रात म्हटलं आहे. कोणाला वाटत असेल अशा कारवाईमुळे संजय राऊत आणि शिवसेना खचली आहे असे अजिबात नाही. सूडाच्या कारवाया असत्य कारवाईपुढे कधीही गुडगे टेकणार नाही.

आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो

बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणा काम करत आहेत. मराठी शब्दात सांगायचे झाल्यास आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो. बाळासाहेबांचा मराठी शिवसैनिक आहे. काय कराल डोक्यावर बंदूक लावाल ना, माझी तयारी आहे. ईडी, सीबीआय जे काही असेल हे जे भाडोत्री लोकं सोडले आहेत ते असतील संजय राऊत खोटेपणाला घाबरत नाही. तुम्ही जे खोटे कराल ते तुमच्यावर उलटवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तुमची कबर खोदण्यासाठी सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading