शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ED कडून जप्त
मुंबई : भाजपावर उघडपणे टीका करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आज EDने मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यसरकार विरुद्ध केंद्र सरकार असा सामना रंगणयाची चिन्हे आहेत. ईडीने संजय राऊत यांची अलिबागमधील येथील आठ प्लॉट व मुंबईतील एक प्लॉट अशी मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. तसेच त्यांच्या मुलीच्या लग्नातील खर्चा विषयीही चौकशी केली होती. मात्र आज अचानक मालमत्तेवर जप्ती आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, आज खासदार संजय राऊत हे दिल्लीत असून या संदर्भात त्यांना कोणतीही नोटिस किंवा फोन आला नसल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.
