Friday, June 5, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

14 दिवसात पेट्रोल 8.40 रुपयांनी महागले

नवी दिल्ली : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांपुरते इंधन दरवाढ रोखून ठेवत त्यानंतर निकाल जाहीर होताच देशावर महागाईचा बोजा केंद्र सरकारकडून लादण्यात येत आहेः. यामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. दरदिवशी इंधनाच्या दरात मोठी वाढ होत आहे.

गेल्या 14 दिवसांमध्ये तब्बल 12 वेळा इंधनदरवाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत 8 रुपये 40 पैशांनी डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत. दुसरीकडे वाढत्या महागाईवरुन विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतलीय. महाराष्ट्रात युवा सेनेकडून थाळी बजाव आंदोलन करण्यात आलं होतं. मुंबई पेट्रोल 118.81 रुपये तर डिझेल 103.04 रुपयांना विकलं जातंय. तर, पुणे शहारत 118.29 रुपयांवर पोहोचलंय. तर डिझेल 101.01 रुपयांवर पोहोचलंय.

दरम्यान देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 103.81 रुपयांवर पोहोचला आहे. तर, डिझेलचा दर 95.07 रुपयांवर पोहोचलाय. आर्थिक राजधानी मुंबईतील पेट्रोलचा दर 118.81 रुपये तर डिझेलचा दर 103.04 पैशांवर पोहोचला आहे. आज लीटरमागे 40 पैशांची वाढ झाली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading