आधी अमित ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणायला लावा – सुजात आंबेडकर यांचे थेट आव्हान

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल घोषणा केली की,  ज्या मशिदींवर भोंगे लागतील, त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा लावू. परंतु, हे स्पीकर लावण्यासाठी एकही बहुजन जाता कामा नये. घोषणा तूम्ही करणार आणि बहुजन कार्यकर्ता त्यात भरडला जाणार. माझी राज ठाकरे यांना विनंती आहे, ते स्पीकर लावण्यासाठी अमित ठाकरे यांना पाठवा आणि आधी अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावा. राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे दंगल झाली तर पोलिसांना माहित आहे की पकडायचं कुणाला आहे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते  सुजात आंबेडकर यांनी लगावला आहे. 

राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर सुजात आंबेडकर यांनी कडाडून टीका केली आहे. सुजात आंबेडकर यांनी यावेळी मनसे आणि राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली. ते म्हणाले, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही, असे म्हटले आहे. परंतु,  त्याठिकणी कार शेड बांधण्याचे नियोजन शिवसेनेचेच होते. याशिवाय कारशेड येथे आंदोलन करणाऱ्या मुलांवरील गुन्हे मागे घेऊ असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. परंतु, अद्याप तसे झाले नाही. या मुलांवर गुन्हे दाखल असल्यामुळे परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांना पासपोर्ट मिळत नाही.”

सुजात आंबेडकर काय म्हणाले?

राज साहेबांना ही कळकळीची विनंती.. तुम्ही शरद पवारांचा इंटरव्हू घ्या… तुम्ही स्वतःचा उभा पक्ष भाड्यानं लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा.. पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लिम दंगलीवर उभा नका करु, एवढी कळकळीची विनंती आहे आणि महाराष्ट्र ऑथोरीटी, मुंबई ऑथोरीटी, महाराष्ट्र मुंबई पोलीस, या सगळ्यांना एवढं आव्हान देतो.. की तुमच्या सगळ्यांसमोर हे वक्तव्य केलंय त्यांनी!
जर दंगल झाली, तर तुम्हाला माहितीये कुणाला पकडायचं..

Leave a Reply

%d bloggers like this: