Friday, June 5, 2026
Latest NewsSports

S. Balan Trophy – एमईएस इलेव्हन, गेम चेंजर्स इलेव्हन, पुनित बालन ग्रुप, केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघ उपांत्य फेरीत!

पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित तिसर्‍या ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत एमईएस इलेव्हन संघ, गेम चेंजर्स इलेव्हन, पुनित बालन ग्रुप संघ आणि केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी या संघांनी सर्वाधिक गुण मिळवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत हर्ष संघवी याच्या ६६ धावांच्या खेळीच्या जोरावर एमईएस इलेव्हन संघाने केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा पराभव करून सलग पाचवा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एमईएस इलेव्हन संघाने २० षटकात ७ गडी गमावून १८१ धावांचे आव्हान उभे केले. हर्ष संघवी (६६ धावा) आणि जय पांडे (५४ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानाला उत्तर देताना केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव ९७ धावांवर आटोपला. एमईएस संघाच्या दिपक डांगी (३-०) आणि आयुष काब्रा (२-१६) यांनी चमकदार गोलंदाजी केली.

राकेश मते याच्या गोलंदाजीच्या जोरावर एसके डॉमिनेटर्स संघाने जिनवानी इलेव्हन संघाचा १४ धावांनी पराभव करत चौथा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एसके डॉमिनेटर्स संघाने १६.५ षटकात १७४ धावांचे आव्हान उभे केले. अक्षय पांचारीया (३५ धावा), सागर सिंग (३० धावा) आणि अजय बोरूडे (२५ धावा) यांच्या फलंदाजीमुळे संघाने पावणे दोनशे संघाचे आव्हान उभे केले. याला उत्तर देताना जिनवानी इलेव्हन संघाचा डाव १६० धावांवर मर्यादित राहीला. हिमांशु अगरवाल याने ७० धावांची खेळी केली. एसके संघाच्या राकेश मते याने (३-३२) आणि शुभम खटाळे (२-१०) यांनी अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय सोपा केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading