वडगाव मावळ कोर्टातील सरकारी वकिलांवर अट्रोसिटी कायद्या नुसार गुन्हा दाखल
पुणे:आज वडगाव मावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांच्या विरुद्ध एका नवोदित वकिलांना जातीवाचक शिवीगाळ केल्या मुळे अट्रोसिटी कायद्या नुसार कलम 3(1) R, S, U व 3(2)(7) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे , सदर बाबत सविस्तर माहिती अशी की दि. 10/03/2022 रोजी फिर्यादी व त्यांचे सहकारी हे आशिला सोबत वडगाव मावळच्या कोर्टात कामकाज करीता गेले असता. केस मधील सरकारी वकील अगरवाल यांच्या शी केस बद्दल बोलण्या साठी गेले असता. फिर्यादी यांना जाती वाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली होती . सदर बाबत आता अगरवाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
