क्लासिक लिजंड्सने गुढी पाडव्याच्या सुमुहूर्तावर महाराष्ट्रात ५०० युनिट्स ग्राहकांना डिलिव्हर केली

मुंबई:क्लासिक लिजंड्सने मराठी नववर्षाच्या सुमुहूर्तावर ५०० नवीन जावा आणि येझदी मोटरसायकल्स महाराष्ट्रातील ग्राहकांना सुपूर्द केल्या. महाराष्ट्रभरातील क्लासिक लिजंड्सच्या १९ डीलरशिप्समधून एकाच दिवसभरात या सर्व डिलिव्हरीज देण्यात आल्या. यामध्ये जावा आणि येझदी मोटरसायकल्सच्या श्रेणीचा समावेश आहे.

जावा कॉम्युनिटीमध्ये नव्या सदस्यांचे स्वागत करताना क्लासिक लिजंड्सचे सीईओ आशिष सिंग जोशी यांनी सांगितले, “आजच्या शुभ मुहूर्तावर मोटरसायकलप्रेमींना त्यांच्या आवडत्या जावा आणि येझदी मॉडेल्सच्या चाव्या सुपूर्द करून त्यांचा सणाचा आनंद द्विगुणित करताना आम्हाला खूप समाधान आणि अभिमान वाटत आहे. महामारीनंतर सर्वसामान्य जीवन पुन्हा सुरु करताना ग्राहकांकडून मिळत असलेला हा प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक आहे. आम्हाला खात्री आहे यंदाच्या वर्षभरात आमच्या कॉम्युनिटीमध्ये अधिकाधिक रायडर्स दाखल होतील.”

क्लासिक लिजंड्सने जावा ब्रँड भारतीय बाजारपेठेत २०१८ साली परत आणला आणि संचालनाच्या अवघ्या वर्षभरात जावा, जावा फोर्टी टू आणि पेरक यांच्यासह एक मजबूत पोर्टफोलिओ व त्याबरोबरीनेच देशभरात विस्तारलेले डीलरशिप नेटवर्क उभे केले.  ऍडव्हेंचर, स्क्रॅम्बलर आणि रोडस्टर या तीन नवीन मॉडेल्ससह येझदी ब्रँड आणून या वर्षी क्लासिक लिजंड्सने आपला पोर्टफोलिओ अधिक जास्त मजबूत केला. सध्या या ब्रँडच्या ३०० पेक्षा जास्त डीलरशिप्सचे नेटवर्क देशभरात विस्तारलेले असून अधिकाधिक आधुनिक क्लासिक मोटरसायकल्सप्रेमींच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ही संख्या वाढवण्याची त्यांची योजना आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: