१७ जूनला भेटीला येणार ‘भिरकीट’

सध्या अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘भिरकीट’ या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर झळकले होते , त्यात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी आणि तानाजी गालगुंडे एकाच स्कुटरवर दिसले होते. या धमाल पोस्टरवरून या चित्रपटाचीविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. अखेर १७ जून रोजी ‘भिरकीट’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या संदर्भात दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणाले की, आजच्या काळात पैसा, प्रसिद्धी एकंदरच भौतिक सुखाचे भिरकीट प्रत्येकाच्या मागे हात धुवून लागले आहे. यात एक अशी व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे, जी स्वतःच ‘भिरकीट’ आहे. त्या व्यक्तीच्या आयुष्यात अशी घटना घडते आणि तो त्यात कसा अडकला जातो, हे ‘भिरकीट’मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यातूनच उडू लागतात विनोदाची कारंजी. हा चित्रपट एक ब्लॅक कॉमेडी आहे, कलाकारही तितकेच ताकदीचे आहेत. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, सैराट फेम तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद या कलावंतांनी विनोदाची बहार उडवून दिली आहे.”

क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कथा अनुप जगदाळे तर पटकथा संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत ,कॅमेरा मीर आणि संकलन फैजल महाडिक यांचे आहेत. शैल-प्रितेश या हिंदी जोडीचे धमाल संगीत लाभले आहे ,युफओने या चित्रपटाची धुरा सांभाळली आहे. रसिकप्रेक्षक या विनोदी सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: