आदित्य ठाकरे म्हणाले, थ्री व्हील चांगलं चालू आहे
पुणे:राज्यात सध्या केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या सरकारमधल्या मंत्र्यांवर विविध घोटाळ्याप्रकरणी कारवाया केल्या आहेत. अन्य मुद्द्यांवरील राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यावर राज्याचे पर्यावरण मंत्री यांना राज्यात पॉलिटिकल प्रदूषण वाढले आहे का असं पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, थ्री व्हील चांगलं चालू आहे असे उत्तर दिले.
आदित्य ठाकरे आज पुण्यात पर्यायी इंधन परिषदेच्या प्रदर्शनाच्या कार्यक्रमास आज उपस्थित
राहिले त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे म्हणाले,पुण्यात आज इंधन परिषदेची आज आपण ही परिषद भरवली आहे. पर्यायी इंथान कुठल मिळेल याचा विचार चालू आहे ज्या नागरिकांना इलेक्ट्रिक गाडी घ्यायची आहे त्यांच्यासाठी हे प्रदर्शन आहे .पुणे हे शहर ऑटोमोबाईल साठी प्रसिद्ध आहे. पुणेकरांनी इथे यावं इथे त्यांना चांगले पर्याय मिळतील. पुणे हे मुख्य केंद्र आहे बाकीचे ठिकाण त्यांना फॉलो करतील .
आज इंधन प्रदर्शनात इलेक्ट्रिक बसचे चे अनावरण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले .त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले,दुचाकी, बस चे अनावरण आज झाले आहे .पेट्रोल, डिझेल पेक्षा इलेक्ट्रिक वर खर्च कमी होतो .पुणे, मुंबई, औरंगाबाद मध्ये सगळा खर्च आता बसेस वर होईल .महाराष्ट्रात देखील scarpping पॉलिसी काही दिवसात राबवणार.
महाराष्ट्रात येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन दिसतील. असे आश्वासन यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले. स्टार्टअप या प्रोग्रोम ला राज्यात सरकार पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले ,स्टार्टअप राज्यात खूप आहे आता त्यांना स्केल अप करायचे आहे . असे आदित्य ठाकरे म्हणाले.
