आंतरविद्यापीठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत 28 वर्षांनंतर रौप्यपदकापर्यन्त मजल

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघाने आंतरविद्यापीठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत तब्बल 28 वर्षांनंतर रौप्यपदकापर्यन्त मजल मारली आहे. संघाचे नेतृत्व रिषभ देशपांडे याच्याकडे होते. 

विद्यापीठाअंतर्गत दरवर्षी बॅडमिंटन स्पर्धा आयोजित केली जाते. विविध पातळ्यांवर स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावर्षीची जिल्हास्तरीय स्पर्धा पुण्यात आयोजित करण्यात आली होती. जिल्हापातळीवर यश संपादन केलेला संध विभागीय स्पर्धेत सहभागी होतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाची पश्चिम विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. या संघाचे नेतृत्व रिषभ देशपांडे याने केले. सोहम पाटीलआर्य भिवपाठकीअधीप गुप्तातेजस देवअजिंक्य पाथरकर आणि हृषिकेश होले या खेळाडूंचा संघात सहभाग होता. संघ अधिकारी व मार्गदर्शक म्हणून शिंदे व पांढकर होते.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने शिवाजी विद्यापीठ आणि मध्यप्रदेशच्या अहिल्यादेवी विद्यापीठाचा पराभव करत विभागीय पातळीवरील स्पर्धेत यश संपादन केले.

देशपातळीवरील आंतरविद्यापीठ स्पर्धेत 16 संघांचा सहभाग होता. चार गटात ही स्पर्धा झाली. एक एक फेरी पार करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. या फेरीत संघाने कालिकत विद्यापिठाचा पराभव केला. चुरशीच्या उपांत्य फेरीत जैन विद्यापीठ बंगळुरू संघाचा 3-1 ने पराभव करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संघ अंतिम फेरीत पोहोचला. या फेरीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने पंजाब विद्यापीठ पतियाळा विरूद्ध पूर्ण ताकदीने खेळ केला आणि रौप्यपदकापर्यंत मजल मारली. रिषभ देशपांडेच्या सक्षम नेतृत्वाखाली 28 वर्षांनंतर आंतरविद्यापीठ स्पर्धेत हे यश मिळाले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: