दादा जे. पी. वासवानी यांच्या समाधीचे भूमिपूजन

पुणे :  साधू वासवानी मिशनने चेती चंद – सिंधी नववर्षानिमित्त आज मिशनने दादा जेपी वासवानी यांच्या पवित्र समाधीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यांचे गुरु साधू वासवानी यांच्या समाधी शेजारीच दादा जेपी वासवानी यांची समाधी बांधण्यात येणार आहे. पवित्र समाधीसाठी नियोजित डिझाइनचे मॉडेल देखील आज प्रदर्शित करण्यात आले. ही समाधी म्हणजे एक तीर्थक्षेत्रा सारखे असेल जेथे नागरिक आनंद आणि शांती अनुभवून श्रद्धांजली अर्पण करतील.

आज सकाळी ७ वा. शास्त्रवचन व कीर्तनाने दिवसाची सुरुवात झाली. यावेळी 108 हवन आणि 108 वेळा गायत्री मंत्राचे पठण करण्यात आले. शास्त्रपूजन (औजारांची पूजा) करण्यात आली. त्यानंतर पहिल्या सत्रात सत्संगमध्ये दीदी कृष्णा कुमारी यांचे भाषण आणि साधू वासवानी आणि दादा जेपी वासवानी यांचे प्रवचन होते. दीदी कृष्णा आपल्या भाषणात म्हणाल्या, “समाधी या शब्दाचा अर्थ ईश्वराशी एकरूप होतो. लाडक्या दादांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण समाधीत घालवला. त्यांचा प्रत्येक विचार, प्रत्येक कृती एकात्मतेतून निर्माण झाली. आम्ही एकदा दादांना विचारले, “परमात्म्याशी एकरूपता अनुभवण्यासाठी आपण काय करावे?” प्रत्युत्तरात त्यांनी आम्हाला तीन आदर्श दिले. पहिली हृदयाची शुद्धता, दुसरी अटळ श्रद्धा आणि तिसरी देव आणि त्याच्या निर्मितीवर प्रेम.

दुपारी 1 वाजता नारळ फोडून भूमिपूजनाचा शुभ समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला मान्यवर व अध्यात्मिक प्रमुखांनी उपस्थिती लावली.

पुण्याचे बिशप फादर थॉमस डाबरे म्हणाले, “दादांना धर्माचे मर्म खरोखरच समजले होते; ते धर्माचा संदेश जगले.

डॉ.के.एच. संचेती, संचेती हॉस्पिटल म्हणाले, “हे विलक्षण जबरदस्त वाटते. दादांची स्पंदने सर्वत्र अनुभवता येतात.”

भूमिपूजनानंतर उपस्थित सर्वांना लंगर प्रसाद वाटण्यात आला. या दिवशी, मिशनने 130 गरजू कुटुंबांना रेशन किट, 372 मुलांना आनंदाची पाकिटे आणि 372 मुलांना स्टेशनरीचे वाटप केले.

Leave a Reply

%d bloggers like this: