टाटा टी प्रीमियमतर्फे शानदार शोभायात्रा; महाराष्ट्रीय महिलांच्या ‘सर्वगुणी’ व्यक्तिमत्वाचा सन्मान

पुणे : मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या गुढी पाडव्याच्या सुमुहूर्तावर टाटा टी प्रीमियम देशाचा चहा या टाटा टीच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमधील आघाडीच्या ब्रँडने पुणे आणि औरंगाबादमध्ये अतिशय अनोखी महिला शोभायात्रा काढण्यात आली.  स्थानिक परंपरासंस्कृती आणि स्थानिक वैशिष्ट्यांचा सन्मान करण्याच्या आपल्या ब्रँड धोरणाचे पालन करत टाटा टी प्रीमियमने मराठी महिलांच्या सर्वगुणी‘ व्यक्तिमत्वाचा सन्मान करणारा हा उपक्रम हाती घेतला होता. या शानदार शोभायात्रेमध्ये दोन्ही शहरांमध्ये ३०० पेक्षा जास्त सर्वगुणी‘ महिला अस्सल महाराष्ट्रीय पेहराव नऊवारी साडी आणि त्याला साजेसा साजशृंगार करून एका पिलियन रायडरसह बाईक राईड करत सहभागी झाल्या होत्या. यावेळी अभिनेत्री सई ताम्हणकरने या उपक्रमाचा शुभारंभ केला आणि पुण्यामध्ये या ३ किमी रॅली राईडमध्ये सहभागी झालेल्या महिला बायकर्ससोबत बातचीत देखील केली.

 या कॅम्पेनबद्दल अधिक माहिती देताना टाटा कन्ज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे पॅकेज्ड बेव्हरेजेसचे भारत आणि दक्षिण आशियाचे प्रेसिडेंट पुनीत दास यांनी सांगितले, “महाराष्ट्रातील लोकांसोबत भावनिक नाते अधिक दृढ करून राज्याचा अभिमान असलेली वैशिष्ट्ये ठळकपणे दर्शवणे हा टाटा टी प्रीमियमचा उद्देश आहे. स्थानिक परंपरासंस्कृती व स्थानिक वैशिष्ट्यांचा सन्मान करण्याच्या आमच्या धोरणाला अनुसरून आम्ही प्रत्येक क्षेत्राची वैशिष्ट्ये दर्शवणारे उपक्रम सादर करत आहोत ज्यामुळे ग्राहकांची या ब्रँडमधील रुची अधिकाधिक वाढेल. टाटा टी प्रीमियमने महाराष्ट्रातील लोकांची आवडनिवड लक्षात घेऊन तयार केलेल्याबहुगुणी मिश्रणाप्रमाणेच सर्वगुणी‘ असलेल्या महिलांचा सन्मान करण्यासाठी महिला बाईक रॅली शोभायात्रेचे आयोजन करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.”

 यावेळी ढोलताशाच्या गजरात सर्वगुणी महिलांचे स्वागत करण्यात आलेविशेष सजावट आणि प्रॉप्स उपलब्ध असलेले फोटो बूथ लावून फोटो काढून घेण्याची सोय करण्यात आली होती. दर्शकांना टाटा टी प्रीमियम चहा पाजण्यात आलासॅम्पलिंगसाठी पॅकेट्स देखील देण्यात आली. यावेळी कोविडपासून बचावासाठी सुरक्षा नियमांचे पालन करण्यात येत होते. याआधी टाटा टी प्रीमियमने दिल्लीउत्तर प्रदेशहरयाणा आणि ओडिशामध्ये देखील त्या-त्या क्षेत्रांची वैशिष्ट्ये दर्शवणारे उपक्रम आयोजित केले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: