Tuesday, August 11, 2026
Latest NewsPUNE

केंद्र सरकारची फसवी धोरणे व बेरोजगारीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फे “राष्ट्रीय फेकू दिवस” साजरा

पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने स्वारगेट येथील चौकात १ एप्रिल हा दिवस “एप्रिल फूल” ऐवजी “राष्ट्रीय फेकू दिवस” म्हणून साजरा केला. या अभिनव आंदोलनाच्या प्रसंगी मोदीजींची प्रतीकात्मक भूमिका साकारणाऱ्या युवकाने इतर युवकांच्या बेरोजगारी, महागाई या सर्व मागण्यांना उत्तर म्हणून गाजर वाटण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कांबळे म्हणाले, “सहाजिकच गेल्या सात वर्षांपासून दोन कोटी रोजगार देण्याची भाषा करत सत्तेत आलेल्या भाजप सरकारने नव्याने रोजगार दिलेच नाही किंबहुना नोटबंदी ,जीएसटी, कोविड आपत्ती या सर्व परिस्थितीमध्ये तरुणांचे आहे ते रोजगार गेले आहेत. या सर्व परिस्थितीला केवळ आणि केवळ केंद्रातील मोदी सरकारची चुकलेली धोरणे कारणीभूत आहेत”, असा थेट आरोप कांबळे यांनी केला.

या आंदोलनप्रसंगी “मोदीजी आम्हाला रोजगार द्या”, “मोदीचे आम्हाला नोकऱ्या द्या”, “रोजगार हवे- गाजर नको” अशा सर्व घोषणांनी हा परिसर दणाणून सोडला. आंदोलन प्रसंगी प्रवक्ते प्रदीप देशमुख शहराध्यक्ष किशोर कांबळे मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर, राकेश कामठे,आंनद सगरे,अमोल ननावरे, संतोष नांगरे, गिरीष गुरुणानी ,किरण खैरे,गोविंद जाधव , स्वप्नील जोशी,तालिब मदारी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading