S. Balan Trophy – पुनित बालन ग्रुप संघाचा विजयाचा चौकार; अर्थव काळेची नाबाद शतकी खेळी !!

पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित तिसर्‍या ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयाचा चौकार मारला. विझार्डस् इलेव्हन संघाने स्पर्धेतील दुसरा विजय नोंदविला.

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत अर्थव काळे याच्या नाबाद शतकी खेळीमुळे पुनित बालन ग्रुप संघाने जिनवानी इलेव्हन संघाचा ९८ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुप संघाने २० षटकामध्ये ६ गडी गमावून २४८ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये अर्थव काळे याने नाबाद १०० धावा तर, ऋतुराज वीरकर याने ९० धावांची खेळी केली. या दोघांनी ६४ चेंडूत १५१ धावांची भागिदारी रचली व संघाला धावांचा डोंगर उभा करून दिला. या धावसंख्येचा पाठलाग करताना जिनवानी इलेव्हनचा डाव २० षटकात १५० धावांवर मर्यादित राहीला.

नवीन कटारीया याच्या चमकदार गोलंदाजीच्या जोरावर विझार्डस् इलेव्हन संघाने गाडगे अँड कंपनी इलेव्हन संघाचा ३ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना गाडगे अँड कंपनी इलेव्हन संघाने २० षटकात १४५ धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये विझार्डस् संघाच्या नवीन कटारीया याने ३० धावात ३ गडी टिपले व प्रतिस्पर्धी संघाच्या डावाला मर्यादा घातल्या. हे आव्हान विझार्डस् इलेव्हन संघाने १९.५ षटकात व ७ गडी गमावून पूर्ण केले. रत्नदीप लोंढे (३४ धावा) आणि आदित्य गजभिये (२८ धावा) यांनी संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

Leave a Reply

%d bloggers like this: