शुक्रवारी पुणे शहरात नवीन 32 कोरोना रुग्णांची नोंद
पुणे: राज्य सरकारने आज पासून कोरोना निर्बंधात शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे . तरीही कोरोनाचे रुग्ण पुण्यात किंचित वाढत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात नवीन 32 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 15 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत संख्या 6 लाख 61 हजार 944 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 52 हजार 459 रुग्ण बरे झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही. तर आतापर्यंत पुणे शहरात 9349 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 136 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 2रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 1892 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
