Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिवसेना नेते रघुनाथ कुचीक प्रकरण : पीडितेचे रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप    

पुणे : शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचीक यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांपासून अजित पवार, संजय राऊत, आदित्य ठाकरे, निलम गोऱ्हे आदींकडे मी दाद मागितली. मात्र कोणीही मला मदत केली नाही. इतकेच नव्हे तर आपल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही माझा फोन घेतला नाही, असा गंभीर आरोप रघुनाथ कुचीक प्रकरणातील पीडितीने रुपाली चाकणकर यांच्यावर केला आहे.

शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचीक यांनी 2 महिन्यापूर्वी एका तरूणीवर बलात्कार केला. तसेच तिचा गर्भपातही घडवून आणल्याचा आरोप आहे. या संदर्भात गुन्हा दाखल झाल्या नंतर या प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या. त्यानंतर आज या प्रकरणातील पीडित महिलेने प्रसार माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली.

मी कोणत्याही टेस्टसाठी तयार 

कुचिक यांच्या मुलीने माझ्या नार्को टेस्टची मागणी केली होती. तेव्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्या तक्रारीची तात्काळ दखल घेतली होती. मात्र माझ्या तक्रारीची आज तागायत दखल घेतली गेलेली नाही. चाकणकर म्हणाल्या की माझ्याशी संपर्क होत नाहीये. पण मी फोन केला तर त्या माझा कॉल घेत नाहीत, असे आरोप पीडितीने रुपाली चाकणकर यांच्यावर केला आहे. तसेच माझी कोणतीही टेस्ट करा मी त्या टेस्टला तयार आहे, अशीही ती म्हणाली.

रघुनाथ कुचीकची DNA टेस्ट करा  

पीडितेने शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचीक यांच्यावर बलात्कार व गर्भपाताचा आरोप केल्यावर कुचिक यांनी आपण आपली पुरूषार्थ चाचणी केली. ते म्हणाले की ते बाप होऊ शकत नाही. यावर पीडिता म्हणाली, त्यांचं हे स्टेटमेंट खोटं आहे. मी दोन महिन्यांपूर्वी माझी DNA टेस्ट केली आहे. आता कुचीक यांची सुद्धा DNA टेस्ट करावी अशी माझी पोलीसांना विनंती आहे. म्हणजे सत्य समोर यईल. या प्रकरणी मी हायकोर्टात जाणार आहे.

कुचिकच्या काळ्या धंद्यांचे पुरावे कोर्टात सादर करणार   

रघुनाथ कुचिक भरपूर काळे धंदे करत आहेत. असा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता .त्यावर ती मुलगी म्हणाली, ते काही बेकायदेशीर धंदे करतात त्याबद्दल पुरावे देखील मी कोर्टात देणार आहे. कागदोपत्री सगळ्या गोष्टी मी कोर्टात देणार आहे.

    

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading