इंधंन , पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा बैलगाडी निषेध मोर्चा 

पुणे : पाच राज्यातील लोकसभेच्या विधानसभा निवडणुकीनंतर मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी केली नाही. उलट रोज पेट्रोल, डिझेलचे दर वाढतच आहेत. त्यामुळे सामान्य कुटुंबाचे बजेट कोलमडले असून मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीतर्फे
बैलगाडी व घोडयावर बसून निषेध मोर्चा काढण्यात आला. बालगंधर्व चौक ते झेड ब्रिज पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती अध्यक्ष सीमा सातपुते, रोहन पायगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख, श्रुती गायकवाड, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस पुणे शहर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशांत जगताप म्हणाले, या मोदी सरकारला लाज वाटायला पाहिजे. पाच राज्यातील निवडणुका झाले तरि हे केंद्र सरकार पेट्रोल डिझेलचे दर कमी करत नाही. या सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी केले नाही तर सामान्य लोकांना सायकल चालवायची वेळ येईल. या मोदी सरकारला आपण केलेल्या चुकीची जरा आठवण येऊ दे. म्हणून आज आम्ही बैलगाडी व घोड्यावर मोर्चा काढला आहे. जर मोदी सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी केले नाही तर आम्ही येथील पुढील काळात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रशांत जगताप यांनी दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: