पुणे महापालिकेत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1030 रिक्त सदनिकांसाठीची ऑनलाईन सोडत

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एकूण 1030 रिक्त सदनिकांसाठीची ऑनलाईन सोडत आज महापालिकेत पार पडली.
ही सोडत पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते काढण्यात आली आहे यावेळी सदनिकांसाठी एकूण 16 हजार 545 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 1 हजार 30 अर्जांची सोडत काढण्यात आली आहे. यावेळी पुणे महापालिकेच नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

पुणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या नवीन इमारत येथे सदनिकांसाठीची सोडत अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. दरम्यान, सदर सोडतीसाठी 5 ऑगस्ट 2021 ते 4 सप्टेंहर 2021 रोजी दरम्यान नागरीकांकडून मागणी अर्ज मागवण्यात आले होते. त्यामध्ये एकूण 16 हजार 545 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 1 हजार 30 अर्जांची सोडत आज काढण्यात आली. उर्वरित नागरिकांना प्रतिक्षा यादीत समाविष्ठ करण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे म्हणाले, ‘गरीब लाभार्थ्यांना परवडणा-या दरात घर उपलब्ध करुन दिले आहे.
त्यामुळे शासनाच्या प्राप्त होणा-या अनुदानासह शहरातील नागरीकांचे घराचे स्वप्न पुर्ण होणार आहे.
त्याचबरोबर वित्तीय संस्थांनी लाभार्थ्यांना स्वस्त किमतीत कर्ज उपलब्ध करुन दिल्यास या योजनेला गती मिळेल.’

Leave a Reply

%d bloggers like this: