काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाच्या सत्याला भाजपा घाबरले का ? – विजय कुंभार

पुणे:दिल्लीचे  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर आज तेजस्वी सुर्या यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले, सिक्युरिटी बॅरियर तोडले, मुख्यमंत्र्यांच्या घराच्या दरवाज्यावर रंग फासले. हे सर्व होत असताना दिल्ली पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत राहिले. जिथे इतर मुख्यमंत्र्यांच्या घराच्या आसपास लोकांना फिरकू देखील दिले जात नसताना दिल्लीच्या मुख्यमंत्री यांच्या घराबाहेर भाजपच्या गुंडांच्या एका मोठ्या समूहाला अशा पद्धतीने राडा घालू देणे हा एका पूर्वनियोजित कटाचा भाग आहे. आपचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार आणि समस्त आम आम आदमी पक्ष पुणे तर्फे या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

केवळ दहा वर्षांमध्ये आपने दिल्लीपाठोपाठ पंजाब मध्ये सत्ता मिळवल्याने भाजप  प्रचंड विचलित झाला आहे. दिल्ली महानगरपालिकेमध्ये पंधरा वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या भाजपला पराभवाची काळजी वाटत असून केंद्र सरकारने एक कायदा आणून दिल्ली महानगरपालिकांच्या नियोजित निवडणूका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. काश्मीर फाइल्स या चित्रपटावरून भारतीय जनता पक्ष राजकारण करत आहे. भाजप गेली अनेक दशके काश्मीरी पंडितांचे राजकारण करत असून प्रत्यक्षात 13 वर्षे केंद्रात सत्ता असून देखील भाजपने काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी हितासाठी काहीच केले नाही. त्यामुळे काश्मीर फाइल्स चित्रपटाचे पोस्टर लावून आपण काश्मिरी पंडितांसाठी काहीतरी करत असल्याचा आव भाजपा आणत आहे, ही बाब रविंद केजरीवाल यांनी देशातील लोकांच्या नजरेसमोर आणली.

दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार स्थलांतरित काश्मीर पंडित कंत्राटी शिक्षकांना नियमित करून त्यांना स्थायी रोजगार देऊ बघत असताना लेफ्टनंट गव्हर्नर यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाने काश्मिरी पंडित शिक्षकांच्या हिताविरोधामध्ये उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये आडकाठी आणली हे आता सप्रमाण आम आदमी पक्षाने काल सिद्ध केले आहे. *दिल्लीतील सरकार काश्मीरी पंडितांसाठी काम करत असताना भाजपच्या ताब्यातील सरकारे या प्रश्नावर केवळ राजकारण करत आहेत हे लोकांना कळत आहे.

भाजपचा दुटप्पी चेहरा हा विद्रुपपणे लोकांच्या समोर आल्याने चिडून, घाबरून जाऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आहे. याप्रकरणातील भाजपचे नेते, कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: