Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

पीएमपीएलच्या सर्व बस आता लवकरच होणार डिझेल फ्री -लक्ष्मीनारायण मिश्रा

पुणे:पीएमपीएलच्या ह्या बस आधी डिझेल वर चालायच्या. पण शहरात होणाऱ्या प्रदूषणामुळे त्या आम्ही डिझेल फ्री करणार असल्याची घोषणा पीएमपीएलचे सहव्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पुण्यातील पत्रकार परिषद केली.
पीएमपीएलचा 19 एप्रिल ला वर्धापन दिन असून त्यानिमित्ताने आपण विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कालावधीत पीएमपीएलच्या बस नागरिकांसाठी बसचे पास हे स्वस्त दरात ठेवले आहेत. सेलिब्रिटी मार्फत हा वर्धापन दिन होणार आहे. नागरिकांच्या पास साठी आम्ही लॉटरी पण काढणार आहोत. जास्तीत जास्त या नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन. लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी केले.
पीएमपीएलच्या बस या आम्ही वर्धापन दिनानिमित्त सगळ्यात बस आम्ही रस्त्यावर प्रवासासाठी काढणार आहोत. असे मिश्रा म्हणाले.
मागच्या आठवड्यात पीएमपीलच्या बस मध्ये एका तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न झाला होता .त्यावर मिश्रा म्हणाले, आम्ही याची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. सीसीटीव्ही मार्फत या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करणार आहेत असे लक्ष्मी नारायण मिश्रा म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading