Sunday, June 21, 2026
BusinessLatest News

भारत आणि आशियातील हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसाठी भविष्यात कलीनरी आयडी हेच आधार कार्ड मानले जाईल

पुणे : अकोही (ACOHI) एशियाच्या मुख्य कार्यालयातुन भारताच्या  हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये कलीनरी आईडी  मूवमेंटची सुरवात झाली आहे, ज्याला हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमधील विशेष सुरक्षिततेची प्रक्रिया म्हणता येईल. अकोही (ACOHI) चे अध्यक्ष डॉ. सानी अवसरमल  यांनी पुण्यातील अकोही एशियाच्या मुख्य सचिवालयात (एशियन कंट्रीज चेंबर ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री) आयोजित राष्ट्रीय स्तराच्या पत्रकार परिषदेत कलीनरी आयडी सर्टीफिकेशनची घोषणा केली.

कलीनरी आयडी केवळ हॉस्पीटॅलिटी क्षेत्रातील तज्ञ उत्पादनांना व इतर विशिष्ट दर्जाच्या लोकांना दिला जातो. ज्यामध्ये फक्त एका वर्षासाठी कागदपत्रे आणि प्रक्रियांची तरतुद असते . हा आईडी मिळवण्यासाठी प्रत्येक ब्रॅंडला दर वर्षी या प्रक्रियेतुन जावे लागते. पेपर पडताळणी व कागदपत्री पूर्तता केल्यावर कलीनरी आयडी प्रदान केला जातो जो शहर, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असतो. याला हॉस्पिटॅलिटी उद्योगातील कोणत्याही ब्रँडसाठी अत्यंत प्रतिष्ठित मानले जाते.

कलीनरी आयडी लिस्टींग (२०२२) ही संपूर्ण एशियातील एक विशेष प्रक्रिया आहे ज्यात व्यक्ती, ब्रँड किंवा कंपनीची सखोल व संपूर्ण पार्श्वभूमी तपासली जाते आणि दर वर्षी आवश्यक पडताळणी केली जाते.  यापूर्वी ही पद्धत्ती उपलब्ध नसल्यामुळे किंवा जास्त संशोधन, माहिती, पार्श्वभूमी नसल्याने अनेकदा चुकीचे विक्रेते, लोक आणि उत्पादने हॉस्पिटॅलिटी उद्योगाला सेवा देत होते, ज्यामुळे पुर्वी इंडस्ट्रीमधे अनेक नकारात्मक परिणाम दिसून आले व अनेक फसवणूकी झाल्या परिणामी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील ग्राहकांना याचा त्रास सहन करवा लागला. कोही (ACOHI) चे अध्यक्ष डॉ. सानी अवसरमल म्हणतात की, कलीनरी आयडी आणि लिस्टींग प्रोसेस हॉस्पिलॅलिटी उद्योगांचा कणा मजबूत करेल आणि या आंतरराष्ट्रीय प्रक्रियेद्वारे सर्वात महत्वाच्या उत्पादनांना आणि विक्रेत्यांना महत्व, दर्जा व विशेष ओळख मिळेल. ही प्रक्रिया भारतातील व एशियातील हॉस्पिटॅलिटी उद्योगांसाठी बेंचमार्क ठरे, .ज्यातुन आवश्यक सुरक्षितता, व्यापकता आणि गुणवत्तेची हामी मिळेल.
आपल्या पुढील वाटचालीत अकोही भारतातील हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री व जगासाठी सर्वात सुरक्षित,दर्जेदार आणि प्रीमियम पाण्याची तरतुद आणेल. ज्यातुन भारतीय नागरिकांना आणि येथे राहणार्‍या इतरांना सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजेच पाण्याचे देखील आरोग्यदायी लाभ मिळणार आहे. भारतातील स्टार श्रेणीतील हॉटेल्सपासून ते स्ट्रीट फूड पर्यंतच्या ग्राहकांसाठी ही पद्धती आरोग्यदायी ठरेल. मानवी शरीरात ७०% पाणी असते आणि म्हणूनच पाणी हा घटक सर्वात आवश्यक बनतो, तरीही

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading