डिजिटल लेन्डर – लोनटॅप ने लाँच केले व्हर्च्युअल लिमिटलेस कार्ड सोल्यूशन 

पुणे  : लोनटॅप या अग्रगण्य डिजीटल लेंडरने स्वताच्या एनबीएफसी द्वारे 30 मार्च 2022 रोजी मोबाइल व्हर्च्युअल कार्ड सोल्यूशन लॉन्च करण्याची घोषणा केली, ही जलद आणि सुरक्षित संपर्करहित पेमेंट पद्धत्ती मोबाइल वॉलेट मध्ये सहजपणे लोड केली जाऊ शकते. न्यु मोबाइल व्हर्च्युअल कार्ड सोल्यूशन डिजिटल, कॉन्टॅक्टलेस व्यावसायिक पेमेंटच्या वाढत्या मागणीसाठी योग्य आहे.
महामारीने आज काम करण्याची, व्यवसाय चालवण्याची पद्धत बदलवली आहे ज्यामुळे शेवटी घरातून काम किंवा डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळते. यामुळे इतर उद्योगांनाही त्यांची उत्पादने आणि सेवा डिजिटल चॅनेल द्वारे पुरवणे भाग पडले आहे. त्याच विचारसरणीला पुढे नेऊन, हे व्हर्च्युअल कार्ड लोन टॅप ग्राहकांना डिजिटल पद्धतीने सोयीस्कर आणि सुरक्षित पेमेंट पर्यायांच्या एक पाऊल जवळ नेण्यास मदत करेल. यात ग्राहकाला प्रत्यक्ष कार्ड न बाळगता ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर पेमेंट करता येते.
हे नवीन व्हर्च्युअल कार्ड सोल्यूशन मोबाइल डिव्हाइससह पेमेंट सुलभ करेल आणि संपर्करहित पॉइंट-ऑफ-सेल टर्मिनल्सवर व्यवहार सुलभ, सुरक्षित करेल. डिजिटल स्वरूपातील कार्ड भौतिक कार्डाची गरज कमी करेल. यात ग्राहकाला फक्त ई-कॉमर्स मर्चंटच्या प्लॅटफॉर्मच्या पेमेंट पेजवर जावे लागेल आणि पे-वाया-कार्ड पर्याय निवडावा लागेल. ग्राहक त्याला जारी केलेले व्हर्च्युअल कार्ड वापरून कार्ड तपशीलांमध्ये प्रवेश करू शकतो आणि त्याच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवलेला ओटीपी वापरून पेमेंट अधिकृत करू शकतो. अशा प्रकारे, संपूर्ण प्रवासात, प्रत्यक्ष कार्ड बाळगण्याची गरज नाहीशी होते, आणि क्रेडिट मिळवणे जलद, सुलभ बनते.
लॉन्च वेळी बोलताना, लोनटॅपचे सह-संस्थापक आणि सीईओ – सत्यम कुमार म्हणाले, “लोनटॅपमध्ये, आम्हाला आमच्या ग्राहकांना अखंड खर्चास सक्षम बनवुन आर्थिकरित्या स्वातंत्र्य बनवायचे आहे. व्हर्च्युअल कार्ड्सची ही नवीन ऑफर ग्राहकांसाठी सोयीस्कर, योग्य आणि सुरक्षित आहे. व्हर्च्युअल कार्ड पर्यायाने प्लास्टिक आणि कागदाचा वापर कमी करेल आणि ग्रीन इकोनॉमीसाठी योगदान देण्यामध्ये एक छोटेसे पाऊल पुढे टाकेल.

Leave a Reply

%d bloggers like this: