‘इर्सल’ चित्रपटाचे मोशन पोस्टर ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘इर्सल’ हा मराठी चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर २ एप्रिलला म्हणजे गुडीपाडव्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. एक व्हिडिओ प्रसारित करत याची घोषणा करण्यात आली आहे.
असंख्य अडचणींवर मात करून आता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सर्वांचे पाठबळ होते, आहे म्हणूनच हा प्रवास शक्य झालाय. येत्या शनिवारी म्हणजे २ एप्रिलला “इर्सल”चे मोशन पोस्टर रिलीज करतोय. अशी पोस्ट करत चित्रपटाच्या टायटल रिलीजची घोषणा करण्यात आली आहे. भलरी प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अनिकेत बोंद्रे आणि विश्वास सुतार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.तर संगीत दिनकर शिर्के यांनी दिले आहे. चित्रपटाचा टीझर, ट्रेलर, गाणी भलरी प्रोडक्शनच्या युट्यूब चॅनलवर प्रसारित केली जाणार आहेत.
चित्रपटाच्या कथानकाबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. त्यामुळे टायटल रिलीज झाल्यानंतर कथानकाबद्दक माहिती मिळणार आहे.राजकारण या विषयाभोवती चित्रपटाचे कथानक असल्याचे समजते.
