एकविरा देवी यात्रेनिमित्त कार्ला गडावर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

पुणे : कार्ला येथे श्रीक्षेत्र एकविरा देवी यात्रेनिमित्त जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने एकदिवसीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या प्रशिक्षणास देवस्थानचे कर्मचारी, सुरक्षारक्षक, पोलिस कर्मचारी, पुरातत्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान मास्टर ट्रेनर विवेक नायडू यांनी आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव कार्य, प्रथमोपचार आदीविषयी मार्गदर्शन केले. लखन गायकवाड यांनी आणीबाणीच्या उचल पद्धती, त्रिकोणी बँडेज, स्टेचर, सीपीआर आदींचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षणार्थींच्या शंकेचे निरसन करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी प्रशिक्षणाचे प्रास्ताविक केले.

Leave a Reply

%d bloggers like this: