इतिहासातून कळली डुल्या, भांग्या, जिलब्या मारुतीची रंजक कथा

पुणेः सोन्या मारुतीचा गाजलेला सत्याग्रह, जिलब्या मारुतीला घातल्या जाणाऱ्या जिलब्यांच्या माळेची कथा, डुल्या मारुतीचा पेशवेकालीन इतिहास, विजय मारुतीचा इतिहासातील कोर्ट खटला अशा एक ना अनेक मारुतींची रंजक नावे आणि त्यांच्या इतिहासातील कथा ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळाली.

इतिहास संस्कृती कट्टा आणि डॉ. चंद्रशेखर गणेश पेशवे यांच्यावतीने पुण्यातील मारुती या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानात ज्येष्ठ इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांनी पुण्यातील विविध मारुती मंदिराच्या कथा उलगडल्या. यावेळी विद्याचरण पुरंदरे, किर्ती जोशी, सुरेश तरलगट्टी, महेश फणसळकर, सचिन दाते, राजन ठाकुर देसाई, विशाल खुळे, योगेश गायकर, उमेश जोशी उपस्थित होते.

अचानक मारुती, बटाट्या मारुती, भांग्या मारुती, बंदीवान मारुती, पत्र्या मारुती, डुल्या मारुती, गवत्या मारुती, उंटाडे, मारुती, जिलब्या मारुती, भिकारदास मारुती, दुध्या मारुती, विसावा मारुती या मारुती मंदिरांचा इतिहास आणि त्यांच्या नावाची कथा देखील त्यांनी यावेळी सांगितली.

मंदार लवाटे म्हणाले, पुण्यात ३/४ इंच ते अकरा फुट उंचीचे मारुती आहेत. त्याचबरोबर त्यांना दिलेली नावे आणि त्यांचा इतिहास देखील तितकाच रंजक आहे. पुण्यात अशी अनेक मंदिरे आहेत ज्याला एतिहासिक वारसा लाभला आहे. परंतु त्या एतिहासिक वास्तू पाडून त्याठिकाणी नव्या वास्तू उभारल्या जात आहेत. अशा जुन्या वास्तूंचे जतन केले पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: