आदि महोत्सव – २०२२ तून नागरिकांनी अनुभवली आदिवासी संस्कृती 

 
पुणे : आदिवासी  हस्त व नृत्यकलेला प्रोत्साहन व उत्तेजन देण्यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा “आदि महोत्सव – २०२२” या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते.  महोत्सवातंर्गत आदिवासी हस्तकला प्रदर्शन, आदिवासी पारंपारिक नृत्यस्पर्धा व आदिवासी जीवनावर आधारित लघुपट विनामुल्य दाखविण्यात आले. टीआरटीआय संस्थेच्या वतीने आयोजित महोत्सवा अर्तगत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आली होती. नागरिक, कला समिक्षक, संग्राहक, कलाकुसरीचे प्रेमी यांना शासनाच्या माध्यमातून जणू ही एक ५ दिवसीय मेजवाणीच होती.
या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातून एकूण १०० आदिवासी हस्तकलाकारांना व ५०० नृत्यकलाकार आमंत्रित करण्यात आलेले होते. या प्रदर्शनात वारली चित्रकला, बांबूच्या व वेताच्या वस्तु, धातूच्या कलाकुसरीच्या वस्तु, आदिवासी दाग-दागिने, कांगदी लगद्याचे व लाकडाचे मुखवटे, इत्यादी हस्तकला वस्तूंचा प्रदर्शनात समावेश होता.
 आदिवासी जीवनावर आधारित लघुपट या महोत्सवात आदिवासी जीवनावर आधारित लघुपट विनामूल्य दाखविण्यात आले.  लघुपट महोत्सवास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. ४ ते ५ आदिवासी जीवनावर आधारित लघुपट प्रेक्षकांना दाखविण्यात आले.
आदिवासी हस्तकला प्रदर्शन व विक्री आदिवासी हस्तकला वस्तुंना नागरी भागात मोठया प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध असल्यामुळे दुर्गम भागात राहणारे आदिवासी व नागरी भागातील ग्राहक यांना एकत्रित आणून आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या वस्तू प्रदर्शित करुन त्यांच्या विक्रीव्दारे या कलाकारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात  आली होती.  प्रदर्शनात विक्रीसाठी असलेल्या कलाकृती  हस्तकाला, आदिवासी पुस्तके, बांबू आर्ट, वॉल पेंटिंग, वारली पेंटिंग,पेन स्टॅन्ड, टिशू स्टॅन्ड, कार्ड होल्डर, किचन, फुलदाणी, फुले, कपडे, साड्या, शोच्या वस्तूंचा समावेश होता. खाद्यप्रेमींसाठी :- चुलीवरचे चिकन, खेकडे, कोळंबी, सुकट, भाकरी (ज्वारी, बाजरी, तांदूळ ) मासेवडी, भात, थालपीठ, आप्पे, घावन, दही, ताक, मठ्ठा, कोकम इ. पदार्थांचा समावेश होता.
-आदिवासी कलाकारांनी जिंकली प्रेक्षकांची मने  आदिवासी कलाकारांनी जिंकली प्रेक्षकांची मने, आदिवासी बांधवांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेचे आयोजन संस्थेच्या प्रागंणात करण्यात आले होते. यावेळी पहिल्या तीन नृत्य पथकांना पारितोक्षिक देउन सन्मानीत करण्यात आले तर एका नृत्य पथकाला उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. पहिल्या क्रमांकाच्या पथकास २५ हजार ०१, द्वीतीय १५हजार ०१, तृतीय १० हजार ०१ तर उत्तेजनार्थ  ५ हजार ०१ रूपायांचे बक्षिस देण्यात आले. या स्पर्धेचा औपचारिक बक्षिस वितरण समारंक्ष २६ मार्च २०२२ रोजी,  संयकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून योगिता म्हस्के आणि शिल्पा दीक्षित यांनी काम पाहिले. तर नम्रता कामत यांनी सुत्रसंचलन केले.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा “आदि महोत्सव – २०२२” हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्तन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: