बकार्डी एनएच-७ विकेंडर महोत्सवाला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद प्रतिसाद

पुणे : जगातील अग्रगण्य इ-स्पोर्ट्स कंपन्यांपैकी एक नॉडविन गेमिंग आणि बकार्डी यांनी भारतातील सर्वात मोठा व प्रसिद्ध – बकार्डी एनएच ७ विकेंडर नुकताच आयोजित केला होता. उत्साहाच्या , लाइव्ह परफॉर्मन्सच्या म्युजिक, कॉमेडी आणि गेमिंग फेस्टीव्हलसाठी पुणे व अन्य शहरातील हजारो चाहत्यांनी यावेळी हजेरी सावली. ज्यात प्रेक्षकांसाठी दररोज ७ तास नॉन स्पॉप मनोरंजन करण्यात आले.

यावेळी एब्डन मेक, अंकुर तिवारी, अनुष्का मस्खी, अनु मेनन, अन्यासा, अजीम बनातवाला, निक, कायन लाइव्ह, कायोबेन, लोजल, मॅडबॉय/मिंक, मेरी काली , नीती पलता ,ओशो जैन, प्रतीक कुहाड, राजा कुमारी लाइव्ह, रंज एक्स क्लिफर, रित्विज , समर मेहंदी, सपन वर्मा, सीधे मौत, शांतनू पंडित, श्रीजा चतुर्वेदी, सोनाली ठक्कर, सुमैरा शेखर, सुमुखी सुरेश , सुप्रिया जोशी , तबा चाके ,तन्मया  भटनागर , द यलो डायरी ,टिल एप्स, उरोज अशफाक, वरुण ठाकुर, व्हेन चाय मेट टोस्ट व यूंग राजा यासारखे भारतीय कलाकार उपस्थित होते.

समीक्षा उनियल ( ब्रॅन्ड लिड बकार्डी इंडिया अँड साऊथ इस्ट एशिया) म्हणाल्या की, आम्ही दोन वर्षांनातर मैदानात परतलो आहोत आणि प्रेक्षकांचा पुन्हा एकदा मिळालेला उंदड प्रतिसाद पाहुन भाराऊन गेलो आहोत. हा एक अविश्वनीय अनुभव होता. नॉडविन गेमिंंगचे को -फाऊंडर अक्षत राठी म्हणतात की, लोकांना संगीत, कॉमेडी आणि गेमिंगसाठी एकत्र आणण्यासाठी हा महोत्सव नेहमीच अग्रेसर राहिला आहे. कित्येक महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर महोत्सवाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आम्ही भारावुन गेलो आहोत. हा कार्यक्रम सुपर-डुपर यशस्वी करण्यासाठी आम्ही अथक परिश्रम घेतले. प्रेक्षकांच्या आमच्यावरील विश्वासानंतर आता आम्‍ही एप्रिलमध्‍ये इतर ९ शहरांनाना टेकओव्‍हर करण्याससाठी उत्सुक आहोत,”

Leave a Reply

%d bloggers like this: