महिलांसाठी ‘द काश्मिर फाइल्स’च्या विशेष शो चे आयोजन

पुणे :  काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार त्यांच्या वेदना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी दाखविण्यात आलेल्या ‘ द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला. शिवसमर्थ प्रतिष्ठानच्या वतीने हा चित्रपट दाखविण्यात आला.

सिंहगड रस्त्यावरील हिंगणे, माणिकबाग, आनंदनगर या भागातील नागरिकांना हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला. महिला वर्गाला हा चित्रपट पाहता यावा यासाठी अभिरुची सिटी प्राईड येथे केवळ महिलांसाठी खास शो दाखविण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, नगरसेविका मंजुषा नागपुरे, सरोज पांडे, मनाली देव, श्रद्धा शिंदे, नीलेश भिसे, तसेच काश्मिर मधून विस्थापित झालेल्या कुटुंबातील महिला रिटा जुतशी, सुमित्रा बिंदु, अनिता बिंदु उपस्थित होत्या.

काश्मिरी पंडितांवर १९९० साली झालेल्या अन्यायाचे वास्तव सर्वसामान्यांना समजावे, यासाठी हा चित्रपट दाखविण्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, “सिंहगड रोड परिसरातील एक हजार नागरिकांना हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. पुढील काही दिवसांत या चित्रपटाचे दोन शो दाखविण्याचे नियोजन आहे”, असे यावेळी शिवसमर्थ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा दीपक नागपुरे यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: