केंद्रात सत्ता मिळाली तरी यांचा जीव मुंबईत – मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील परिस्थिती न पाहता विरोधक महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. राम आणि रावणच्या गोष्टीसारखी परिस्थिती झाली आहे. रावणाचा जीव जसा बेंबीत होता. तसा काही जणांना जीव मुंबईत आडकला आहे. केंद्रात सत्ता मिळाली तरी यांचा जीव मुंबईत अडकला आहे, आधी रामाच्या नावाने मतं मागितली आता दाऊतच नाव घेऊन मत मागणार तुम्ही, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी भाजपवर केली.

आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. अगदी मोजक्या शब्दात त्यांनी वोरोधकांचा समाचार घेतला.

मुख्यमंत्री म्हणाले, मी मुंबईकर आहे अन् मला याचा अभिमान आहे. आठ भाषांत शिक्षण देणारी मुंबई महापालिका ही एकमेव आहे. कोविड संदर्भात अनेक ठिकाणी हिचे कौतुकही करण्यात आले. पण विरोधकांना केवळ चुकाच दिसतात. कोविड बरा झाला पण ज्यांना द्वेषाची कावीळ झाली असेल तर काय करणार? असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्याला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करू नका

सर्वातच कमी मद्याची दुकाने महाराष्ट्रात आहेत. उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशात महाराष्ट्रापेक्षा जास्त मद्याची दुकानं आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणणं खूप मोठी चूक आहे. राज्याला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज  केले.

सकाळचा प्रयोग यशस्वी झाला असता तर .. 

आम्ही सगळे भ्रष्टाचारी आहोत. दाऊदची माणसं आहोत असे समजलो तरी जर सकाळचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि देशमुखांच्या मांडीला मांडी लावून बसला असता की नाही तुम्ही? आम्ही तुमच्या गळ्यात पट्टा बांधला असता तर? जे काही तुम्ही आमच्या कुटुंबाची बदनामी करत आहात ही नाीच विकृत आणि निंदणीय गोष्ट आहे. मर्द असेल तर अंगावर या, याला मर्दपणा म्हणत नाही. घराघरातील कुटुंबाला बदनाम करायचे,  धाडी टाकायच्या. मागे गडकरी म्हणाले, आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो. तुमच्याकडे ह्यूमन लॉन्ड्रिंग सुरू केलंय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

Leave a Reply

%d bloggers like this: