Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

म्हाडातर्फे देण्यात येणाऱ्या आमदारांच्या घरांविषयी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडांचा मोठा खुलासा

आमदारांना मोफत घरे नाहीत; घरासाठी मोजावे लागणार लाखो रुपये 

मुंबई :  ग्रामिण भागातील 300 आमदारांना मुंबईत म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरं देण्याची घोषणा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. त्यानंतर सर्वसामान्यांसाह विरोधकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तर विविध पक्षातील आमदारांनी ही घर नाकारली आहेत. यावर आज गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट करीत स्पष्ट केले आहेत की, आमदारांना मोफत घरे दिली जाणार नाहीत; या घरांसाठी त्यांना लाखो रुपये मोजावे लागणार आहेत.

आव्हाडांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की,सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे.

दरम्यान, मुंबईत आमदारांच्या निवासासाठी आमदार निवास आहे. त्यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जाता आहे. मात्र तेथे किती आमदार राहतात हा प्रश्न आहे? तसेच म्हाडा लॅाटरीत त्यांच्यासाठी आरक्षणही आहे. त्यामुळे वेगळ्या 300 घरांची तरतूद कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading