ड्रूमद्वारे आयोजित डीलर परिषद मुंबईत संपन्न

मुंबई : ड्रूम या २७५ हजारांहून अधिक वाहनांमधून निवडीचे पर्याय देणाऱ्या भारतातील आद्य ऑटोमोबाइल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने नुकतीच आपली ७वी डीलर परिषद मुंबईत घेतली. मुंबईत आयोजित करण्यात आलेली ही दुसरी डीलर परिषद होती.  मुंबई, ठाणे, पुणे, बडोदा, सुरत व अहमदाबाद या शहरांतील २००हून अधिक वाहन डीलर्स या कार्यक्रमाला उपस्थित होते. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून ड्रूम डीलर समुदाय अधिक भक्कम करत आहे, नवीन उत्पादने सर्वांपुढे आणत आहे, बाजारातील माहिती मिळवत आहे आणि आपल्या विस्तृत डीलर नेटवर्कमधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या डीलर्सची दखल घेत आहे.

ड्रूमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप अगरवाल म्हणाले, “ड्रूमच्या समुदायात वाहन डीलर्सना खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि वाहन खरेदी-विक्रीच्या डिजिटल स्थित्यंतरात मदत करण्यासाठी आम्ही त्यांच्याशी भागीदारी व सहयोग करतो. ११५१ शहरांतील २१,८०० क्लाउड डीलर्स आमच्याशी जोडलेले आहेत याबद्दल आम्ही स्वत:ला सुदैवी समजतो.

प्री-ओन्ड वाहनांच्या व्यवसायात विक्रेते व खरेदीदार हे महत्त्वाचे भागधारक असतात आणि अशा कार्यक्रमांद्वारे ड्रूमला त्यांच्याशी सातत्याने संवाद साधणे शक्य होते. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून ड्रूमचे नवीन फीचर्स आणि अन्य अनेकविध लाभ यांवर डीलर्स व विक्रेत्यांसाठी प्रकाश टाकणे शक्य होते. त्यायोगे ड्रूमच्या यशोगाथेत सहभागी होण्यासाठी आणखी नवीन भागीदारांना आवाहन करून बाजारपेठेचा विस्तार करण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने जाता येते.

Leave a Reply

%d bloggers like this: