आप तर्फे शाळेत विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराचा मूक निषेध
पुणे:आप पुणे व आप पालक युनियन तर्फे पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील शाळेत ११ वर्षाच्या एका विद्यार्थिनी वर झालेल्या बलात्काराचा ‘मूक निषेध’ , काळ्या फिती लावून आज, शुक्रवारी करण्यात आला. प्रज्ञा शिल्प चौक , जंगली महाराज रोड येथे आज हा निषेध करण्यात आला.
त्यावेळेस ‘मुलींची सुरक्षा कुणाच्या भरवश्यावर?”११वर्षाच्या मुलीवरच्या अत्याचाराचा तीव्र निषेध!’, ‘स्मार्ट सिटीत अडीच महिन्यात ६१बलात्कार!!’ ,’दामिनी, भरोसा सेल करते काय?’, ‘ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेला जबाबदार कोण? ‘, असे प्रश्न हातातील फलकाद्वारे उपस्थित करण्यात आले.
स्मार्ट सिटीत रस्त्यावरील अपघाताच्या भीतीचे दडपण पालक वर्गावर होतेच , आता शाळेच्या आतील सुरक्षा सुद्धा बेभरवाश्याची होणे ही बाब अत्यंत गंभीर असून त्याचे मुलींच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतात. शिक्षणाच्या माहेरघराची व्यवस्था सुधारण्याचे काम आता शिक्षण मंडळ, शाळा व्यवस्थापन आणि पोलीस यांच्यावर आहे. पालकांचा सहभाग , विश्वास आणि संवादाचे वातावरण , लैंगिक शिक्षण हे दीर्घकालीन जागृतीचे उपक्रम राबवणे सुद्धा गरजेचे आहे असे आप चे मुकुंद किर्दत यांनी यावेळेस सांगितले.
या मूक निषेधात वैशाली डोंगरे, सतीश यादव, दिनेश चौधरी,शंकर थोरात,विकास लोंढे, रमेश पाटील, तेजस डोंगरे, नितीन चव्हाण, सुरेश तरडे, विक्रम गायकवाड, पियुष हिंगणे, शुभम ससाणे, नितीन ससाणे,किर्तीसिंग चौधरी, किरण कांबळे, दत्तात्रय भिंगे, ईश्वर तुजारे, व्यंकटराव आडटराव, ऋषिकेश मारणे, जयश्री डिंबळे आदी कार्यकर्ते सामील झाले होते.
