Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

2023 पर्यंत पुण्यात 24 तास पाणीपुरवठा योजना आयुक्तांनी दिले आश्वासन – खासदार गिरीश बापट

पुणे: पुण्यात पाण्याची समस्या ही अजून भरपूर आहे त्यावर सत्ताधारी भाजप व विरोधी पक्षात महानगरपालिकेत भरपूर वाद निर्माण झाला होता. त्यावर 2023 पर्यंत पूर्ण होईल 24 तास पाणीपुरवठा योजना होईल.असे नआयुक्तांनी मला आश्वासन दिले आहेत अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत खासदार गिरीश बापट यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला संजय मळेकर, भाजपचे पुणे शहर प्रवक्‍ते पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.
गिरीश बापट यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुण्याच्या पाणी प्रश्नाबाबत भेट घेतली त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
महापालिका बरखास्त झाल्या मुळे नागरिकांच्या विविध समस्या सोडवायला नगरसेवक उपलब्ध नाहीत . त्यावर गिरीश बापट म्हणाले, नागरिकाच्या ,समस्यां सोडवाव्याच लागतील. दुर्लक्ष करता कामा नये. असे मी आदेश आयुक्तांना दिले. आहेत. महापालिकेवर प्रशासन नसेल तरी,मी सर्वपक्षीय नगरसेवकांना पत्र लि हणार आहे . असे गिरीश बापट म्हणाले.
काल अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारने आमदारांच्या घरांसंदर्भात एक घोषणा केली. मुंबईतील गोरेगाव येथे आमदारांसाठी 300 एचआयजीची घरे बांधण्यात येणार आहेत. त्यावर गिरीश बापट म्हणाले मी या निर्णयाचे स्वागत करतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading