अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण : शाळेच्या नराधम वॉचमनवर गुन्हे शाखेने केली कारवाई- अमिताभ गुप्ता
पुणे:पोस्को अंतर्गत गुन्हा मध्ये वाढ होताना दिसत आहे .काल एका शाळेच्या वॉचमनने 11 वर्षयी मुलीवर लैंगिक आत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आणि एकच खळबळ माजली.
पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी मुलगी शाळेत गेल्यानंतर एक जण शाळेत आला व त्याने या मुलीशी ओळख असल्याचे. दाखवत तिला ढकलत शाळेच्या बाथरुममध्ये नेले. त्यानंतर तिचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.बाहेर कुणाला काही सांगितलेस तर बघ, अशी धमकी देऊन तिथून निघून गेला. अशी घटना शाळेच्या आवरा मध्ये घडली आहे .
त्यावर 24 तासाच्या आत या आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्हा शाखेने ही कामगिरी केली. अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत माहिती दिली.
