जिल्हा स्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत डेक्कन अ उपांत्य फेरीत

पुणे – येथे सुरु झालेल्या मेजर शशी चषक निमंत्रित जिल्हास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत डेक्कन जिमखाना संघाला संमिश्र यशावर समाधान मानावे लागले. त्यांच्या अ संघाने उपांत्य फेरी गाठली, तर ब संघाचे आव्हान संपुष्टात आले. डीब्ल्यू स्पोर्टस, खडकवासला व्हॉलीबॉल क्लब आणि फत्तेचंद बॉइज संघांनी गटातील सर्व सामने जिंकताना उपांत्य फेरी गाठली.

चिंचवड येथील शिवाजी उदय मंडळाच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत डेक्कन अ संघ गटात दोन्ही सामने जिंकून अ गटात अव्वल राहिले. त्यांच्या ब संघाला मात्र दोन्ही सामने गमवावे लागले. त्यामुळे ड गटातून त्यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले.

ब गटात डीब्ल्यू स्पोर्टस, सी गटातून खडकवासला व्हॉलीबॉल क्लब यांनी गटातून अव्वल स्थान पटकावले.

उपांत्य फेरीत डेक्कन जिमखाना अ संघाची गाठ खडकवासला व्हॉलीबॉल क्लब, तर डीडब्ल्यू स्पोर्टस संघाची गाठ फत्तेचंद बॉईज संघाशी पडणार आहे.

निकाल –
गट अ – डेक्कन जिमखाना अ वि.वि. एमव्हीएससी २५-१५, २५-१७, डेक्कन जिमखाना अ वि.वि. बालेवाडी स्पायकर्स २५-१२, २५-१३, बालेवाडी स्पायकर्स वि.वि. एमव्हीएससी २५-१८, १३-२५, १५-११

गट ब – डीडब्लू स्पोर्टस वि.वि. देहू इलेव्हन २५-१२, २-२२, डीडब्लू स्पोर्टस वि.वि. नवजीवन स्पोर्टस २५-११, २५-१६, नवजीवन वि.वि. देहू इलेव्हन २५-२३, २५-१८

गट सी – खडकवाससला व्हॉलीबॉल क्लब वि.वि. मावळ स्पायक्रस २६-१८, २५-६, १५-९, खडकवासला वि.वि. एनडीए व्हॉलीबॉल २५-१५, २५-२०, एनडीए व्हॉलिबॉल वि.वि. मवाळ स्पायकर्स २०-२५, २५-१७, १५-१२

गट ड फत्तेचंद बॉईज वि.वि. डेक्कन जिमखाना ब २५-८, २५-२२, फत्तेचंद बॉईज वि.वि. सिटी प्राईड व्हॉलिबॉल २५-१४, २५-१८, सिटी प्राईड व्हॉलिबॉल वि. वि. डेक्कन जिमखाना ब २७-२५-२२-२५, १५-११

Leave a Reply

%d bloggers like this: