fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

अभाविपच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न

पुणे:अखिल भारतीय विद्यार्थी परिषद डेक्कन नगर तसेच जिज्ञासा पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमानाने जीवन प्रतिष्ठान, वडारवाडी परिसर, डेक्कन पुणे येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील नागरिकांना मास्क व सॅनिटायझर यांचेदेखील वाटप करण्यात आले तसेच नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली व एकूण 60 रुग्णांची आरोग्य तपासणी देखील यावेळी करण्यात आली.

यावेळी जिज्ञासा पुणे महानगराचे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी कार्यकर्ते, तसेच अभाविप डेक्कन नगराचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. रुग्णसेवा आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा या वाक्याचे पालन करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि जिज्ञासा पुणे महानगर सदैव कटिबद्ध आहे.

अभाविपचे डेक्कन सहनगर मंत्री यशराज फडके म्हणाले,अभाविप गेले भरपूर वर्षे डेक्कन नगर तसेच जिज्ञासा पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमानाने जीवन प्रतिष्ठान, वडारवाडी परिसर, डेक्कन परिसरातील नागरिकांसाठी मोफत शिबिराचे आयोजन करते .या वर्षी पण मोफत शिबिराचे आयोजन केले होते. या भागातील एकूण साठ जणांनी आरोग्य शिबिरात सहभाग घेतला.असे यशराज फडके म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading