मोदींनी केली मराठीत भाषणाला सुरुवात; मेट्रोसह विविध कामांचे उद्घाटन

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी  आज रविवारी मेट्रोसह विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनासाठी पुणे दौऱ्यावर आहेत. महापालिकेची निवडणूक पुढील काही महिन्यात होणार असल्याने भाजपने यानिमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  एमआयटी  कॉलेज मध्ये भाजपने सभा आयोजित केली होती.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरुवात केली आहे. ते म्हणाले ,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले-सावित्रीबाई फुले, महर्षी कर्व्हे यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यातील माझ्या बंधु-भगिणींना नमस्कार करतो. देश स्वातंत्र्याची पंच्याहत्तीर साजरी करतो आहे. भारताच्या स्वातंत्र्यामध्ये पुण्याचं योगदान ऐतिहासिक राहिलंय. लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू, सेनापती बापट, गोपाळकृष्ण देशमुख यासारख्या अनेक स्वातंत्र्य सेनानींना आदरपूर्वक नमन करतो. 

आज मुळा-मुठेसाठी 1100 कोटींच्या प्रोजक्टवर काम सुरु होत आहे. आज पुण्याला ई-बसेसही मिळत आहेत. आज पुण्याच्या विविधता पूर्ण आयुष्यात एक सुंदर भेट मिळाली आहे. ती म्हणजे आर के लक्ष्मण यांची आर्ट गॅलरी पुण्याला प्राप्त झाली आहे. पुणे वासियांचं मी खूप अभिनंदन करतो. मी दोन्ही महापौरांना, त्यांच्या सहकाऱ्यांना खूप खूप सदिच्छा देतो. पुणे आपल्या सांस्कृतिक, आध्यात्मिक तसेच राष्ट्रभक्तीसाठी प्रसिद्ध राहिलं आहे. सोबतच पुणेने शिक्षण, रिसर्च आणि डेव्हलपमेंट, आयटी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्रात प्रगती केली आहे. आमचं सरकार पुणेवासियांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक प्रकल्पांवर काम करत आहे, असं मोदी म्हणाले.
काही वेळापूर्वी मी मेट्रोने प्रवास केला. ही मेट्रो प्रवास सोपा करेल, प्रदुषणापासून मुक्तता करेल. कोरोना साथीदरम्यानही मेट्रो सेवेसाठी तयार आहे. आपल्या देशात गतीने शहरीकरण होत आहे. 2030 पर्यंत आपली शहरी लोकसंख्या 60 कोटींच्या पार जाईल. ही लोकसंख्या अनेक संधी प्रमाणेच आव्हानेही घेऊन येते. शहरात निश्चित सीमेमध्येच फ्लायओव्हर बनू शकतात. अशामध्ये आपल्याकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे मास ट्रान्सपोर्टेशन.. त्याची अधिकाधिक निर्मिती करणे होय. त्यासाठी आमचं सरकार काम करत आहे. 2014 पर्यंत देशात फक्त दिल्ली NCR मध्येच मेट्रोचा विकास झाला होता. आज देशात दोन डझनाहून अधिक शहरांमध्ये मेट्रो एकतर सुरु झालीये अथवा तीचं काम सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्रात पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, ठाणेमध्ये मेट्रोचा विस्तार होत आहे. मेट्रोने प्रवास करण्याची सवय लावून घ्या. तुम्ही जितका प्रवास मेट्रोमधून कराल.तेवढी तुम्ही आपल्या शहराची मदत कराल.असे नरेंद्र मोदी म्हणाले.
आज लोकार्पणासाठीही मला संधी तुम्ही दिलीत त्याबद्दल मी आभार मानतो. आधी भूमीपूजन झाल्यावर कळायचंच नाही की कधी उद्घाटन होणार आहे. हे यासाठी महत्त्वाचं की वेळेवर प्रकल्प पूर्णत्वास नेले जाऊ शकतात .असे नरेंद्र मोदी म्हणाले

Leave a Reply

%d bloggers like this: