देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर शेजारी बसले राजकीय चर्चांना उधाण

पुणे : पुणे मेट्रो प्रकल्पाच्या लोकार्पण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे एकमेकांच्या शेजारी बसले होते. विशेष म्हणजे या दोघांमध्ये या समारंभावेळी ‘गुप्तगू’ सुरू होती. त्यामुळे पवार आणि फडणवीस यांच्यामध्ये नक्की काय चर्चा सुरू होती याचीच चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.
या कार्यक्रमात पवार आणि फडणवीस यांची आसन व्यवस्था शेजारीच होती. त्यामुळे कार्यक्रम सुरू झाल्यानंतर हे दोघेही अनेकवेळा एकमेकांच्या कानात गुप्तगू करत असल्याचे अनेक वेळा पहायला मिळाले. त्यामुळे उपस्थितांच्या नजराही त्यांच्यावरच खिळल्या होत्या.
पहाटेच्या शपथविधीपासून पवार आणि फडणवीस एकत्र आल्यानंतर पुन्हा राजकिय चर्चांना सुरवात होते. मेट्रो प्रकल्पाच्या समारंभात हेच एकत्र दिसल्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार का याची चर्चा रंगू लागली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: